Saam Tv
देश विदेश

रोहिणी न्यायालय परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांकडून गोळीबार; २ जखमी

दिल्लीतील रोहिणी कोर्टात परत एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: दिल्लीतील रोहिणी कोर्टात परत एकदा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रोहिणी कोर्टाच्या (Rohini Court) आवारामध्ये एका वकिलावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. न्यायालयाच्या बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकानेच हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस (Police) सध्या गोळीबाराचे हे गूढ उकलण्यात व्यस्त आहेत. मागील वर्षी देखील रोहिणी कोर्टात गोळीबाराची घटना घडली होती.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी गोळीबाराची घटना रोहिणी कोर्टात घडल्याची पुष्टी केली आहे. पोलिसांना गोळीबाराच्या घटनेची माहिती पीसीआरद्वारे मिळाली होती. सुरक्षारक्षकाने वकिलावर गोळीबार का केला, त्यांच्यात काय झाले, याविषयीची माहिती समोर आली नाही. मात्र, न्यायालय परिसराजवळ झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, कोणती देखील जीवितहानी झाली नाही.

मागील वर्षी २४ सप्टेंबर दिवशी रोहिणी कोर्टाच्या कोर्टरुम क्रमांक २०७ मध्ये २ शूटर्सनी जितेंद्र गोगी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले होते. या गोळीबारात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने टिल्लूला तुरुंगातून अटक करण्यात आली होती, तर कटात सहभागी असलेल्या उमंग यादवला हैदरपूर येथून अटक करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

Cash Rule: घरात २० हजारांची कॅश ठेवताय तर कारवाई होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Gopichand Padalkar Controversy : फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल,जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका

Dasara Melava: महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे, कधी आणि कुठे कोण बोलणार? ठाकरे आणि शिंदेंकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT