Amritsar News Saam Tv
देश विदेश

ड्युटीमुळे त्रस्त बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर केला गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

वृत्तसंस्था

अमृतसरमधील (Amritsar) बीएसएफच्या मेसमध्ये जवानांमध्ये आपापसात वाद झाल्याची माहिती समोर आली. हा वादा इतका पेटला की आपल्याच साथीदारांवार एका जवानाने गोळीबार केला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतकेच नाही तर गोळीबार (Firing) करणाऱ्या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली होती. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोळ्या झाडणाऱ्या जवानाचे नाव सुतप्पा असे आहे. मात्र, बीएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे देखील पहा -

याबाबद बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला आदेश देण्यात आले आहेत. सुतप्पा हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. कामाच्या तणावातून सुतप्पा खूप अस्वस्थ झाला होता. यावरून त्यांचे एका अधिकाऱ्याशी वादही झाले. रविवारी सकाळी त्याने आपल्या रायफलने गोळीबार सुरू केला. त्यानंतर तिथे चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक जखमी झाले. यानंतर पाच जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून जखमींच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT