Delhi school Bus Fire Incident saam tv
देश विदेश

२१ विद्यार्थ्यांना घेवून जाणारी धावती बस भररस्त्यात पेटली, त्यानंतर...

राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरात सेक्टर सातमध्ये एका खासगी स्कूल बसला भीषण (school bus fire incident) आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. २१ शाळकरी विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या या बसमध्ये अग्नितांडव झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनांनाही आग लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. परंतु, दिल्लीच्या अग्निशामक दलाने (Delhi Fire Brigade) घटनास्थळी धाव घेवून बस चालकासह सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी सेक्टर ७ च्या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर तातडीनं या दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत. मात्र, आग इतकी भीषण होती की, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनांनाही आग लागली. या आगीमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT