Police register FIR against BJP leader Ravi Gola and others after chaos at Mavana police station in Uttar Pradesh saam tv
देश विदेश

भाजप नेत्यासह 80 जणांविरोधात गुन्हा दाखल; लवकरच होणार अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Ravi Gola BJP Leader FIR Mavana Police Station Case Details: उत्तरप्रदेशातील मावाना पोलीस ठाण्यातील गोंधळ प्रकरणी भाजप नेते रवी गोला यांच्यासह 80 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

हस्तिनापूरचे रहिवासी सुमित यांचा मृतदेह मावाना पोलीस ठाण्यात ठेवून गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेते रवी गोला यांच्यासह पाच 70 ते 80 अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. हस्तिनापुर येथील सुमित आणि शुभम पाल रविवारी संध्याकाळी आपला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाईकवरून मावनाकडे जात होते. कालवा ओलांडून बामणी मंदिराजवळ पोहोचल्यावर एका अपघातात ते गंभीर जखमी झाले.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही जखमीना रुग्णवाहिकेकडे मेरठच्या रुग्णालयात पाठवले, तसेच अपघातग्रस्त बाईक जप्त केली. मेरठला नेत असताना वाटेतच सुमितचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमनंतर सुमितच्या कुटुंबीयांनी सोमवारी दुपारी 4.15 च्या सुमारास त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. मृतदेह पोलीस स्टेशनला आणल्यानंतर मोठा गोंधळ घातला. सुमितचा मृत्यू नीलगायमुळे नाही तर रोडवर उभी असलेल्या बसमुळे झाली. पोलीस अधिकारी पंकज लवानिया यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण मिटले.

यानंतर इन्स्पेक्टर पवन कुमार यांनी मावाना पोलीस ठाण्यात जगबीर सिंग, अमर सिंग, भाजपचे नेते रवी गोला, प्रदीप कुमार, सर्वेश कुमार यांच्यासह 70 ते 80 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, सुमितच्या कुटुंबीयांनी आणि इतरांनी त्याचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या परिसरात ठेवून मोठा गोंधला घातला. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुकी केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांना लवकरच अटक होणार आहे असे ही पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीतील पराभवानंतर TMC पक्षात फूट? आमदारांमध्ये पडले दोन गट, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न १०० टक्के जुळले?

Cockroach Control Tips: घरात झुरळांची संख्या वाढलीये? हे सर्वात प्रभावी 5 उपाय करून पाहाच

Crime: धाराशिव हादरले! नवऱ्याचे बायकोवर कोयत्याने सपासप वार, शिर धडावेगळं केलं

Konkan Tourism : कोकणातील स्वर्ग! उन्हाळी सुट्टी संपण्याआधी 'हे' हिल स्टेशन नक्की फिरा

SCROLL FOR NEXT