net worth of political parties in india Saam TV
देश विदेश

National Parties Wealth: कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांना अच्छे दिन, भाजपच्या संपत्तीत वेगाने वाढ; काँग्रेसची मालमत्ता किती?

Net Worth of Political Parties in India: आकडेवारीनुसार, गेल्या एक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत सुमारे १ हजार ५३१ कोटींची वाढ झाली आहे.

Satish Daud

Net Worth of Political Parties in India: कोरोना महामारीच्या २०२० ते २०२२ या लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांना फटका बसला. परिणामी लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, हातातील काम गेल्याने अनेकांचे उत्पन्न कमी झाले. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला. मात्र, याच काळात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. (Latest Marathi News)

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने नुकतीच राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप (BJP), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI), माओवादी CPI(M), तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी या आठ राष्ट्रीय पक्षांचा समावेश होता.

या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या एक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत सुमारे १ हजार ५३१ कोटींची वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये ७ हजार २९७ कोटी असलेली राष्ट्रीय पक्षांची संपत्ती २०२१-२२ मध्ये तब्बल ८ हजार ९२९ कोटींवर गेली आहे.

म्हणजेच काय तर एका वर्षात या ८ राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत सुमारे २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची संपत्ती घटली आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या मालमत्तेत सर्वांत जलद म्हणजे वर्षभरात १५१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

भाजपच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ

एडीआरच्या अहवालानुसार, २०२०-२१ मध्ये, भाजपने ४९९०.१९ कोटी रुपयांची एकूण संपत्ती घोषित केली होती. २०२१-२२ मध्ये एका वर्षानंतर त्यात २१.७ टक्क्यांची वाढ होऊन ६०४६.८१ कोटी रुपये इतकी झाली. तर याच कालावधीत काँग्रेसने ६९१.११ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती. यामध्ये आता १६.५८ टक्क्यांची वाढ झाली असून ती ८०५.६८ कोटी रुपयांवर गेली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp News : सलग दुसऱ्या दिवशी Whatsapp गंडलं, स्क्रोलिंग झालं बंद, युजर्स हैराण

मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?

Beetroot Paratha : मुलांना नकळत हेल्दी फूड खायला घालायचंय? मग बीटापासून बनलेला हा पिंक पराठा नक्की ट्राय करा

पुण्यात क्रीडा संकुलमध्ये डोपिंग सदृश इंजेक्शन आढळले; क्रीडा विश्वात खळबळ|VIDEO

Bajaj Pulsar 150 दहा हजारांनी स्वस्त होणार, नवीन किंमत किती?

SCROLL FOR NEXT