Breaking : संजय राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल... Saam Tv
देश विदेश

Breaking : संजय राऊतांविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल...

शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी रविवारी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष शाळिग्राम -

नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रविवारी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी दोन खासगी TV चॅनेलवर दिलेल्या मुलाखतींमध्ये भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज (Deepti Rawat Bhardwaj) यांनी मंडवली पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली होती, या मुलाखतीचा व्हिडिओही (Video) पोलिसांना सादर करण्यात आला होता.

हे देखील पहा -

तपासानंतर पोलिसांनी भादंविच्या 509 आणि 500 (अश्लील शब्दांचा वापर आणि बदनामी) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संजय राऊत यांच्यावरही विनयभंगाचे कलम लावावे, अशी विनंती भारद्वाज यांनी पोलिसांकडे केली आहे.

दीप्ती रावत या भारद्वाज आयपी एक्स्टेंशनमध्ये राहतात. दीप्ती रावतने पोलिसांना सांगितले की, गुरुवारी ती एक खाजगी मराठी वाहिनी पाहत होती. संजय राऊत यांची मुलाखत त्यांच्यावर येत होती, त्यांच्या मुलाखतीत ते भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. त्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी राऊत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी करून तपास सुरू केला असल्याचे समजते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra By-Election: राहुरीत महायुतीचा उमेदवार ठरला; महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावाची चर्चा?

मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्यावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांची नावे चर्चेत

Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

SCROLL FOR NEXT