FIITJEE Scam News ANI
देश विदेश

FIITJEE Scam : विद्यार्थ्यांना कोट्यवधीचा चुना, फिटजी कोचिंग स्कॅम आहे तरी काय? कोणी केली सुरुवात?

FIITJEE Scam News : फिटजी कोचिंग क्लास स्कॅम देशभरात उघडकीस आला आहे. यात अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. हा कोचिंग क्लास कधी सुरु झाला, या सगळ्याची सुरुवात कधी झाली ते जाणून घ्या..

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

FIITJEE Scam : फिटजी कोचिंग सेंटरचा स्कॅम समोर आला आहे. या कोंचिग क्लासेसमध्ये एका वर्षासाठी ३ ते ४ लाख रुपये फी घेतली जात असे. पुण्यातील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची या सेंटर स्कॅममध्ये फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील सेंटर बंद पडले आहे. पुण्यानंतर ठाणे, नागपूरमधीलही फिटजी कोचिंग सेंटर बंज झाले आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील ३०० जणांची या स्कॅममध्ये फसवणूक झाली आहे. जीईईसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कोचिंग क्लासची फी भरली होती. जुलै २०२४ पासून क्लासचे सेंटर बंद आहे. याबाबतीत पालकांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दरम्यान हा क्लासचा स्कॅम समोर आला.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये फिटजी स्कॅम झाला आहे. उत्तर भारतातील लखनऊ, मेरठ, दिल्ली, पटना, इंदौर, भोपाळ यांसारख्या शहरांमध्ये फिटजी सेंटरला टाळे लागले आहे. अनेक सेंटरमधील शिक्षकांनी कंपनी सोडल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक प्रकरणी फिटजी संस्था चालकांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९९२ मध्ये आयआयटी दिल्लीचे पदवीधर डी. के. गोयल यांनी फिटजी कोचिंग सेंटरची स्थापना केली होती. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जात असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT