doctor cheats on pregnant women Saam Tv
देश विदेश

असंख्य महिलांची फसवणूक! 94 मुलांचा बाप निघाला 'हा' डॉक्टर

धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरचे हे कारनामे त्याची मुलगी जेकोबा बेलाद हिने प्रथम उघड केले.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : अनेकवेळा असं काही घडतं की, डॉक्टरही त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे चर्चेत येत असतात. इंडियानापोलिसमधून असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका फर्टिलिटी सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरचं (Dr. Donald Klein) काळं कृत्य समोर आलं आहे. ऐकून धक्का बसेल पण, हा डॉक्टर एक दोन एक दोन नव्हे तर तब्बल 94 मुलांचा बाप (father of 94 boys) निघाला आहे. हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा या डॉक्टरवर डॉक्युमेंटरी तयार झाली. (Fertility doctor cheats on pregnant women, becomes father of 94 children using sperm)

माहितीनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील इंडियानापोलिस येथील आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड क्लाइन असं या डॉक्टरचं नाव आहे. डॉ. डोनाल्ड क्लाइन ( Donald Cline) यांच्या सत्यकथेला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नेटफ्लिक्सने ' Our Father' नावाचा माहितीपट बनवला आहे. 1970 आणि 1980 च्या दशकात हा डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये तो आपले स्पर्म टाकत असे. हे सर्व तो रुग्णांना बेशुद्ध केल्यानंतर करत असे. हा डॉक्टर महिला रुग्णांना न सांगता असं काम करायचा.

धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरचे हे कारनामे त्याची मुलगी जेकोबा बेलाद हिने प्रथम उघड केले. तिचा जन्म शुक्राणू दानातून झाला होता. एके दिवशी तिने घरीच डीएनए चाचणी केली. ज्यामध्ये तिला या डॉक्टरपासून झालेले आणखी सात भावंडे असल्याचे समोर आले. पण धक्कादायक म्हणजे या सर्वांची आई वेगवेगळी होती. त्यानंतर या सातही जणांनी मिळून आपल्या परिवाराचा पसारा कळण्यासाठी शोध सुरु केला. त्यात त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या फॅमिली डॉक्टरट त्याचे स्पर्म्स महिला रुग्णांच्या शरिरात टाकतो आहे. या डॉक्युमेंट्रीत जैकोबा यांनी याबाबत सविस्तरपणे सांगितलेले आहे.

मैट यांची आई म्हणते– जेव्हा मैटची डीएनए चाचणी झाली. तेव्हा माझ्या तोंडातून पहिल्यांदा आलेले शब्द होते की माझ्यावर 15 वेळा बलात्कार झाला, आणि मला हे समजलेच नाही. डॉक्टर क्लाईन जेव्हा आपल्यावर उपचार करीत असे तेव्हा तो दवाखान्यात एकटाच असे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर कायद्यानुसार क्लाईन याला कोर्टात नेण्यात आले. तेव्हाच्या कायद्यातील तरतुदीनुसार, याबाबत गुन्हेगारी कायद्याची तेव्हा तरतूद नव्हती. त्यानंतर केवळ 40 हजारांचा दंड भरुन त्याची सुटका करण्यात आली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT