Crime News Saam tv
देश विदेश

US Shooting: अमेरिकेत खळबळ; खासगी शाळेत गोळीबार, ३ चिमुकल्यांसहित ६ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील एका खासगी शाळेत झालेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसहित ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Nashville School Shooting Updates: अमेरिकेतून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. अमेरिकेतील एका खासगी शाळेत झालेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसहित ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शाळा परिसराच एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)(

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील (America) एका खासगी नॅशिवल ग्रॅड शाळेत (School) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शाळा परिसरातील ३ नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेत हल्लेखोर महिलेचा पोलिसांनी खात्मा केला आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेत सोमवारी एका हल्लेखोर महिलेने टेनेसी येथील नॅशिवल ग्रॅड शाळेत गोळीबार केला. तिने गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेने गोळीबार केल्यामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.

घटनेत ७ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबार तीन चिमुकल्यांसहित तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत गोळीबार करणाऱ्या महिलेला पोलिसांनी गोळीबारात ठार केलं आहे. या घटनेत अशा एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या गोळीबाराच्या घटना घडताना शाळेत नर्सरीपासून सहावीच्या वर्गापर्यंत शिकणारे असे एकूण २०० विद्यार्थी उपस्थित होते.या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केलेल्या ३ विद्यार्थ्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Neck Darkness Removal: टॅनिंगमुळे मान काळवंडली? करून पाहा 'हा' उपाय; त्वचेला काळेपणा होईल कमी

Pancakes Recipe: रविवारी नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT