Supreme Court  saam Tv
देश विदेश

Female Prisoner Pregnant: महिला कैदी होतायत गरोदर, कोर्टाने काय म्हटलं? वाचा सविस्तर

Ruchika Jadhav

तुषार ओव्हाळ

West Bengal News:

तुरुंगातच कैद असलेल्या महिला कैदी गरोदर होताहेत. या गरोदर महिला कैद्यांनी 196 बाळांना जन्म दिलाय. अनेक बाळांचा जन्म हा तुरूंगातच झालाय. अनेक माता आणि बाळांना बेसिक मेडिकल सुविधाही मिळाल्या नाहियेत, ही घटना नेमकी कुठली आहे आणि कोर्टाने यावर काय म्हटलंय जाणून घेऊयात.

पश्चिम बंगालमधले तुरुंग आणि बालसुधारगृह कैदी आणि सुधारण्यासाठी ठेवलेल्या लहान मुलांनी तुडुंब भरलंय. रुईपुर, हावड़ा, हुगळी, उलुबेरिया डमडम, मेदिनीपुर, बहरामपुर, बर्दवान, बालुरघाट या जिल्ह्यांमध्ये महिला तुरुंग आणि बाल सुधारगृह आहेत. 2108 साली कोर्टाने न्यायमित्र तपस कुमार भांजा यांची नियुक्ती केली होती. तुरुंगातील कैद्यांच्या संख्येवर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांना दिले होते.

भांजा यांच्या अहवालात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. राज्यातल्या तुरुंगात महिला कैदैत असताना गरोदर होताहेत असं अहवालात म्हटलंय. इतकंच नाही तर महिला कैद्यांनी आतापर्यंत 196 बाळांना जन्म दिलाय. महिला कैदी आपल्या नातेवाईकांना भेटत असताना तुरुंगांचा एक कर्मचारी तिथे उपस्थित असतो. असा नियम असतानाही एवढ्या महिला कैदी गरोदर कशा काय राहिल्या असा प्रश्न विचारला जातोय.

कोर्टापुढे ही बाब आल्यानंतर कोर्टाने याची गंभीर दखल घेतलीये. वकील भांजा यांनी काही महिला कैद्यांशीही चर्चा केली. तुरुंगात योग्य प्रकारे वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचे भांजा यांना आढळले. डमडमसारख्या सुधारगृहात 400 महिला कैदी होत्या. या सुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी राहत होत्या. त्यामुळे 400 पैकी 90 महिला कैद्यांना अलीपूरच्या सुधारगृहात पाठवण्यात आलंय.

तुरुंग आणि सुधारगृहात काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांवर बंदी घालावी अशी मागणी वकील भांजा यांनी केलीये. तर दुसरीकडे मंत्री अखिल गिरी यांनी ही बाब खोटी असल्याचं सागितलंय. या प्रकरणी कोर्टाने दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. आता तुरुंगातील महिला कैदी गरोदर होण्याचं नेमकं कारण काय हे आता चौकशीनंतरच कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT