दुसऱ्या लग्नासाठी बापानं 4 मुलींचा घेतला जीव; मेहुणीसोबत बांधायची होती लग्नगाठ Saam Tv
देश विदेश

दुसऱ्या लग्नासाठी बापानं 4 मुलींचा घेतला जीव; मेहुणीसोबत बांधायची होती लग्नगाठ

स्वतःच्याच ४ मुलींची विष देऊन हत्या करणाऱ्या आणि नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : स्वतःच्याच ४ मुलींची विष देऊन हत्या Murder करणाऱ्या आणि नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बापाचे चांगलेच बिंग फुटले आहे. आरोपीने दुसरे लग्न करण्याकरिता आपल्या ४ मुलींचा जीव घेतला आहे. या मुलींचे मामा देवाराम याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, की ३ महिन्यांअगोदर त्याची बहीण पप्पूचा कोरोनामुळे Corona मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपी पुरखाराम आपल्या मेहुणीसोबत लग्न करण्याचा हट्ट करत होता.

यासाठी नकार दिल्याने त्याने आपल्या ४ ही मुलींना पाण्यातून विष देत त्यांचा जीव घेतला आहे. नंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बाडमेर जिल्ह्यात शिवठाणा क्षेत्रातील पोशाल नवपुरा Poshal Navpura ​गावात राहणाऱ्या पुरखारामचं १० वर्षाअगोदर पप्पू नावाच्या महिलेसोबत लग्न झाले. त्यांना ४ मुली होते. मात्र, यावर्षी जून महिन्यात आरोपीच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे आरोपी दुसरे लग्न करण्याच्या विचारात होता.

हे देखील पहा-

तो आपल्या मेहुणीसोबतच लग्न करणार असल्याचा हट्ट करत होता. सासरकडचे लोक त्याला वारंवार समजावत होते. मेहुणीचे लग्न दुसरीकडे ठरले असल्याने ती तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. अशात ४ मुलांचा बाप असलेल्या माणसाला मुलगी कोण देणार, असा सवाल त्याला होता. त्यामुळे, त्याने आपल्या ४ ही मुलींचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरखारामच्या ४ ही मुली आपल्या मामाच्या घरी होते.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २ दिवसाआधी आरोपी परत आपल्या सासरी गेला. तिथे जाऊन त्यानं पुन्हा लग्नाकरिता हट्ट केला. सासरकडच्या लोकांनी त्याला समजावले की दुसरीकडे तुझे लग्न लावून देईल. यानंतर तो शुक्रवारी सकाळी ४ ही मुलींना घेऊन आपल्या घरी आला. इथे त्याने पाण्यात कीटकनाशक मिसळून ते आपल्या मुलींना पिण्याकरिता दिले आणि त्यांची हत्या केली आहे.

यामुळे आपल्याला तुरुंगात जावे लागेल या भीतीनं त्याने देखील विष प्राशन केले आहे. पाण्यात उडी घेतली. या व्यक्तीने पाण्यातून विष पाजत आपल्या ४ ही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकले आहे. यानंतर त्यानं स्वतःही विष पित पाण्यात उडी घेतली आहे. मात्र, आसपासच्या नागरिकांनी त्याला उडी घेताना बघितले आणि पाणी कमी असल्याने त्याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र, त्याच्या ४ ही मुलींचा मृत्यू झाला आहे. मुलींचा मामा देवाराम याने सांगितलेल्या माहितीनंतर पोलिसांनी पुरखाराम विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT