मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ४९ वर्षीय मेडिकल स्टोअर मालकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या मेडिकल मालकाच्या मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केले. त्यामुळे मेडिकल मालक चिंतेत होता. राहत्या घरात त्याने गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली पण तोपर्यंत उशिर झाला होता. जागीच मेडिकल चालकाचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल मालकाची मुलगी १५ दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या जातीच्या एका तरुणासोबत पळून गेली होती. तिला शोधण्याचा प्रयत्न केला तर ती इंदुरमध्ये सापडली. पण तिने लग्न केले होते. हे प्रकरण कोर्टात गेले जिथे मुलीने सांगितले की, मी आता कायद्यानुसार विवाहित आहे. त्यानंतर तिने नवऱ्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या या निर्णयामुळेच वडिलांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
मेडिकल मालकाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. आपल्या मुलीच्या आधर कार्डच्या प्रिंट आऊटवरच त्याने ही सुसाइट नोट लिहिली होती. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले . 'तू चुकीचे केले. मी जात आहे. मी तुम्हा दोघांना मारू शकलो असतो पण आपल्याच मुलीला मी कसं मारू.', असे या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते.
मेडिकल चालकाने या सुसाइड नोटमध्ये लिहिले की, 'तू केले ते योग्य नाही. जो वकील काही पैशांसाठी आपले संपूर्ण कुटुंब सोडून देतो. त्यालाही मुली नाहीत का? त्याला वडिलांचे दुःख कळत नाही का? एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि आता समाजात काहीही उरले नाही.' मेडिकल मालकाने आत्महत्या करण्यापूर्वी कोर्टाच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की जर 'आर्य समाजाअंतर्गत लग्न कायदेशीर नाही, तर न्यायालय मुलीला तिच्या जोडीदारासोबत जाण्याची परवानगी कशी देऊ शकते?'
या घटनेनंतर मेडिकल चालकाच्या नातेवाईकांनी त्याच्या मुलीसोबत लग्न करणाऱ्या तरुणाच्या वडिलांना मारहाण केली. घरातून बाहेर खेचून आणत त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये तरुणाचे वडील गंभीर जखमी झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या मेडिकल चालकाची आत्महत्या आणि त्यानंतर तरुणाच्या वडिलांना करण्यात आलेल्या मारहाणीचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.