Uttar pradesh Saam tv
देश विदेश

Shocking : मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वडिलांनी आयुष्य संपवलं; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह

Uttar Pradesh Shocking : मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळलेल्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्टेशनजवळ त्यांचा मृतदेह आढळला.

Vishal Gangurde

अमेठीमध्ये ५० वर्षीय लालजी सिंह यांनी केली आत्महत्या

त्यांचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ सापडला

लालजी यांच्याकडून चिठ्ठीत मुलगा आणि सूनेकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख

लालजी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय

उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० वर्षीय लालजी सिंह नावाच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं आहे. लालजी सिंह यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील सापडली. लालजी यांचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ सापडला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालजी यांच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. यात चिठ्ठीत त्यांनी मुलगा आणि सूनेकडून छळ होत असल्याचं म्हटलं. यामुळे लालजी हे मानसिक तणावात होते. गौरगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजी सिंह यांनी रेल्वे स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण प्रकार घडला. लालजी सिंह यांचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

स्थानिक रहिवासी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, लालजी तणावात होते. ते घरात मुलगा आणि सूनेच्या त्रासाला कंटाळून जायचे. रोज होणाऱ्या वादावर तोडगा काढण्यासाठी लालजी यांनी अनेकदा नातेवाईकांना विनवणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजी यांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावं लागलं होतं. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिस आता लालजी यांनी लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीची चौकशी करणार आहे.

लालजी सिंह यांचा मृतदेह कुठे सापडला?

लालजी सिंह यांचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रेल्वे स्टेशनजवळ सापड ला.

लालजी यांनी आत्महत्येपूर्वी शेवठच्या चिठ्ठीत काय लिहिलं होतंलाल ?

लालजी यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात मुलगा आणि सूनेच्या त्रासाचा उल्लेख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

भाजपात उपऱ्यांना उपरणे, निष्ठावतांची उपेक्षा, दलबदलू दिनकर पाटलांना निष्ठेसाठी रडू

Jalna Accident: समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; ट्रकचा अपघात पाहणाऱ्या अख्खा कुटुंबाला ॲम्बुलन्सनं चिरडलं

मुंबईच्या रणधुमाळीत राणेंची एन्ट्री, कोकणी मतांची धुरा, राणेंच्या खांद्यावर

SCROLL FOR NEXT