Uttarakhand News Saam TV
देश विदेश

Uttarakhand News: मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांना हृदयविकाराचा झटका; कन्यादान न करता घेतला अखेरचा श्वास...

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uttarakhand News: लग्न घर म्हटल्यावर सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले असते. मुलीचे कुटुंबीय आपली मुलगी सासरी जाणार यामुळे थोडे भावूक झालेले असतात. अशात आता उत्तराखंड येथून एक हृदद्रावक बातमी समोर येत आहे. मुलीच्या हळदीला नाचताना हृदयविकाराचा झटका आल्याने वडिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने लग्न घरात दु:खाचा मोठा डोंगर कोसळलाय. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी हल्दवानी येथील मीज हॉलमध्ये लग्न (Marriage) आयोजीत करण्यात आले होते. वधू अल्मोडा येथील रहिवासी आहे. आपल्या मुलीच्या लग्नात काहीही कमी पडायला नको म्हणून वडील दिवसभर कामात व्यस्त होते. हळदी, मेहंदी असे समारंभ शनिवारी रात्री पार पडले. आता हळदी म्हटल्यावर डीजेतर असणारचं.

हळदीला मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. वधूसह सर्व मंडळी रात्री उशिरापर्यंत नाचत होती. तिचे वडील देखील आनंदात नाचू लागले. मात्र त्यांच्या या आनंदात अशा पद्धतीने मिठाचा खडा पडेल याची कुणालाही कल्पना नव्हती अचानक मुलीच्या वडीलांना छातीत दुखू लागेल. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे. रविवारी ठरलेल्या मुहुर्तावर लग्न लागले. मात्र यावेळी कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. हल्दवानी येथील मीज हॉलमध्ये पाणावलेल्या डोळ्यांनी लग्नसोहळा संपन्न झाला. मुलीचे वडील वारल्याने कन्यादानाचे सर्व विधी मुलीच्या मामांनी पूर्ण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT