Kidnap case in UP Saam Tv News
देश विदेश

Crime News : मुलीनं प्रेमविवाह केला, बापाला राग आला; जावयाच्या बहिणीलाच पळवलं अन्...

Father kidnapped his son-in-law sister: उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये दिलीप नावाच्या तरूणाने त्याच्याच गावातील तरूणीसोबत प्रेमविवाह केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये बाचाबाची झाली. मुलीच्या वडिलांनी थेट जावयाच्या बहिणीलाच ताब्यात घेतलं.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मुलीनं प्रेमविवाह केल्यानं चिडलेल्या वडिलांनी जावयाच्या बहिणीचं अपहरण केलं. हातपाय बांधून तिला ऊसाच्या शेतात नेलं. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये दिलीप नावाच्या तरूणाने त्याच्याच गावातील तरूणीसोबत प्रेमविवाह केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये बाचाबाची झाली.

रात्रीच्या वेळेस तरूण आपला परिवार आणि २ सदस्यांसह गाव सोडून शहरात वास्तव्यास गेला. जेव्हा तरूण आणि घरातील २ सदस्यांसह गावाकडच्या घरी हिवाळी कपडे आणि सामान आणायला गेले, तेव्हा मुलीकडच्या कुटुंबीयांनी घेराव घालत हल्ला चढवला. त्यांची कार फोडली आणि जावयाच्या बहि‍णीचं अपहरण केलं. तसेच २ लोकांवर धारदार शस्त्राने वार केले.

इतर नातेवाईकांना मारहाण केली आणि जावयाच्या बहि‍णीचे हातपाय बांधून ऊसाच्या शेतात नेलं. घटनेची माहिती मिळताच, तीन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ऊसाच्या शेतातून हातपाय बांधलेल्या अवस्थेत मुलीला बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले की, 'दिलीप नावाच्या मुलाने आपल्याच गावातील एका तरूणीसोबत प्रेमविवाह केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला.

या वादामुळे मुलाकडचे संपूर्ण कुटुंब शहरात राहू लागले. काल रात्री हा तरूण २ इतर लोक आणि त्याच्या कुटुंबासोबत गावाकडच्या घरात हिवाळी कपडे आणि सामान घ्यायला गेले. हीच संधी साधत तरूणीच्या वडीलांनी मुलाकडच्या नातेवाईकांवर हल्ला केला आणि तरूणाच्या बहिणीला ताब्यात घेतलं.' या प्रकरणी पोलिसांनी ५ महिला आणि एका पुरूषाला अटक केलं. अद्याप १२ जणांना अटक करणे बाकी आहे. त्यांचा शोध पोलीस करीत आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. असंही पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT