Mumbai Crime : खळबळजनक! स्कायवॉकला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Ghatkopar Crime News: घाटकोपर पूर्वला एन वॉर्ड कार्यालयासमोर एका व्यक्तीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकला गळफास लावून आत्महत्या केली.
Mumbai Crime : खळबळजनक! स्कायवॉकला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Ghatkopar Crime NewsSaam Tv
Published On

घाटकोपरमध्ये एका व्यक्तीने रेल्वे स्थानक परिसरामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशन समोर असणाऱ्या स्कायवॉकला गळफास लावून या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

घाटकोपर पूर्वला एन वॉर्ड कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे कर्मचारी या व्यक्तीचा मृतदेह खाली काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

Mumbai Crime : खळबळजनक! स्कायवॉकला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Mumbai Fire: वरळीमध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने घाटकोपर स्टेशनसमोरील एन वार्ड कार्यालयासमोरील स्काय वाकला गळफास लावून आत्महत्या केल्याचा व्हिडीओ आम्हाला मिळाला. दुपारी १.४० वाजता या व्यक्तीने गळफास लावून घेतला. या व्यक्तीचा मृतदेह राजावाडी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Mumbai Crime : खळबळजनक! स्कायवॉकला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Mumbai Travel : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर निसर्गाचा अद्भुत नजारा, नवीन वर्षात भेट द्याच

आत्महत्या केलेल्या या व्यक्तीजवळ एक बॅग सापडली होती. त्यामध्ये काही तरी सापडेल जेणेकरून त्याची ओळख पटवता येईल असे वाटले होत. पण या बॅगमध्ये काहीच सापडले नाही. ही व्यक्ती निराधार होती. तो पैसे मागून खायचा. ही व्यक्ती स्कायवॉकवरतीच झोपायचा. त्याने आत्महत्या का केली यामागचे कारण समजू शकले नाही.

Mumbai Crime : खळबळजनक! स्कायवॉकला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Mumbai Airport: डीजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी; 12 किलो सोनं जप्त, DRIची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com