Odisha Health Minister Attack: ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ जिवघेणा हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला झाला तेव्हा नबा दास एका कार्यक्रमाला जात होते.
आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक दु:ख व्यक्त केले आहे. ते ट्वीट करून म्हणाले की, नाबा दास याच्यावरहील हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेने मला धक्का बसला आहे. मी याचा तीव्र निषेध करतो आणि ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे."
पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आरोग्यमंत्री नाबा दास त्यांच्या कारमधून बाहेर पडले तेव्हा एका एएसआयने त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर बीजेडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी कार्यकर्त्यांनी धरणे दिले आहे, त्यामुळे याठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नबा दास यांच्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता असे म्हटले जात आहे. कारण त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे नबा दास यांना पोलिस संरक्षण देण्यात आलेले असताना हा हल्ला झाला. दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून नबा दास यांच्यावर गोळीबार केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.