FASTag New Rules Yandex
देश विदेश

Fastag: वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून फास्टॅग नियमात मोठे बदल; एका चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे

Fastag Rule Change: १५ नोव्हेंबरपासून फास्टॅगच्या नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत. फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांच्या खिशावर ताण येणार आहे. हे नवीन नियम नेमके काय आहेत हे जाणून घ्या....

Priya More

Summary -

  • महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी

  • फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना आता दुप्पट पैसे मोजावे लागतील

  • यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त पैसे द्यावे लागतील

  • १५ नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू होईल

महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. १५ नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून टोल पेमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. फास्टॅग सिस्टिममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने टोल पेमेंटच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली आहे.

जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुमचा खिसा रिकामा होणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना टोल प्लाझावर २५ टक्के जास्त पैसे द्यावे लागणार आहे. तर रोख रक्कम देणाऱ्यांना दुप्पट पैसे द्यावे लागणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ मध्ये सुधारणा करत हा नवीन नियम लागू केला आहे.

टोल प्लाझावर यापुढे ३ प्रकारे टोल भरता येईल. पहिली पद्धत म्हणजे तुमच्या फास्टॅगमधून थेट टोल टॅक्स कापला जाईल. जर काही कारणास्तव तुमचे फास्टॅग पेमेंट फेल झाले. तर तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत. दुसरा पर्याय म्हणजे रोख पैसे देणे. पण आता नव्या नियमानुसार उद्यापासून तुम्हाला रोख पैसे देताना दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तुमच्या खिशावर ताण येईल.

नवीन नियमानुसार तुम्हाला टोल पेमेंट करण्यासाठी तिसरा पर्याय देखील मिळेल. तिसरा पर्याय म्हणजे UPI पेमेंट सिस्टम. जर फास्टॅगद्वारे पेमेंट फेल झाले तर आता तुम्ही UPI म्हणजेच Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट करता येईल. या प्रक्रियेत तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार नाही. जर एखादा वाहनचालक यूपीआय किंवा कोणत्याही डिजिटल पद्धतीने टोलचे पैसे देत असेल तर त्याला टोलच्या पैशाच्या १.२५ पट पैसे भरावे लागतील. म्हणजेच वाहनचालकांना रोख रक्कमेपेक्षा डिजिटल पेमेंटला कमीच पैसे द्यावे लागतील. याचा अर्थ असा की, फास्टॅग नसलेल्या वाहनांना आता सामान्य दरापेक्षा २५ टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.

सोप्या पद्धतीने घ्या समजून -

- तुमच्या वाहनासाठी टोल १०० रुपये असेल.

- तुमचे फास्टॅग व्यवस्थित काम करत असेल तर तुम्हाला १०० रुपयेच टोल द्यावे लागतील.

- जर तुमचे फास्टॅग पेमेंट फेल होत असेल आणि तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला १२५ रुपये पैसे द्यावे लागतील.

- जर फास्टॅग फेल होत असेल आणि तुम्ही रोख रक्कम देत असाल तर तुम्हाला २०० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT