नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या Central Government नवीन कृषी कायद्यांविरोधात Agriculture Law मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी अनेक महामार्ग जाम केले आहेत, तर रेल रोको सुद्धा करण्यात आलं आहे. त्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच दिल्ली-गुरुग्राम Delhi-Gurugram Highway सीमेवर प्रचंड जाम निर्माण झालेला आहे. तर, गाझीपूर सीमेवरही शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे Delhi Merath Express Way बंद केला आहे. तर या आंदोलनादरम्यान Farmers Protest हरियाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
भारत बंद दरम्यान सिंघु सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर Major Heart Attack या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर यासंबंधात अधिक माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो, कोणाच्या बाजूने कोणतीही अट लादू नये. आपण खुल्या मनाने बोलले पाहिजे आणि ही समस्या सोडवली पाहिजे अशी प्रतिक्रिया हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंह हुडा यांनी भारत बंदवर दिली आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.