Crime News Saam tv
देश विदेश

Shocking: ३ तास उलटा लटकवला, गुप्तांगाला स्पर्श अन् लघवी पाजण्याचा प्रयत्न; तरूणाला बेदम मारहाण

Teen Suffers Inhuman Torture: बल्लभगढमध्ये १८ वर्षीय तरुणावर अमानुष अत्याचार. डांबून ठेवत उलटे लटकवले, टक्कल केले, लघवी पाजण्याचा प्रयत्न. कुटुंबाचा जातीय हिंसाचाराचा आरोप, आरोपी अल्पवयीन, एक फरार.

Bhagyashree Kamble

फरीदाबादच्या बल्लभगढमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षीय तरूणाला ३ तास डांबून ठेवत त्याच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी तरूणाला आधी उलटे लटकवले. नंतर त्याचे टक्कल केले. तसेच भुवया आणि मिशा कापल्या. नंतर जबरदस्तीने त्याला लघवी पाजण्याचा प्रयत्न केला. तरूणाची सुटका झाल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती दुसऱ्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. वैयक्तिक वैर असल्याकारणाने आरोपींनी पीडिताला छळलं. दरम्यान, पीडिताच्या कुटुंबाने याला हिंसाचार म्हटलं आहे. कुटुंबाचा आरोप आहे की, हल्लेखोरांनी जातीशी संबंधित अपशब्द वापरले होते. पीडिताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 'रविवारी रात्री याच लोकांनी त्याला मारहाण केली, तसेच धमकीही दिली'.

पोलीस तपासानुसार, सोमवारी ४ ते ७ वाजेपर्यंत पीडिताला एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं. छताच्या हुकला उलटा लटकवलं. काठ्यांनी मारहाण केली. तसेच गुप्तांगाला स्पर्श केला. हल्ल्यानंतर आरोपींनी त्याला घराबाहेर फेकून दिलं. त्याला वाचवण्यासाठी पीडितेचा भाऊ तेथे पोहोचला. त्यावेळीस पीडितेने चुलत भावाला सांगितले की, तो इतका घाबरला होता की, त्याने कुटुंबाला पोलिसांकडे तक्रार करू नये अशी विनंती केली.

मात्र, पीडिताच्या कुटुंबाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ११ वर्षीय आरोपीला अटक न्यायलयात हजर करून तुरूंगात पाठवलं आहे. तर, २ अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर, दुसरा संशयित आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, तरूणाची प्रकृती बरी झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाईल, असं पोलीस यशपाल यादव यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT