New Delhi Saam Tv
देश विदेश

Husband and Wife Court Case: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला बायकोचं खरं रूप कळालं; कोर्टाने ७ वर्षांनी दिला निकाल

Husband and Wife Court Case: पतीने त्याची पत्नी तृतीयपंथी असल्याचे सांगून घटस्फोट घेतल्याचं ऐकलं नसावं. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून समोर आलं आहे.

Vishal Gangurde

New Delhi: तुम्ही कित्येकदा पती आणि पत्नीचं भांडण झाल्याने घटस्फोट झाल्याचं वृत्त अनेकदा ऐकलं असेल. परंतु तुम्ही कधी पतीने त्याची पत्नी तृतीयपंथी असल्याचे सांगून घटस्फोट घेतल्याचं ऐकलं नसावं. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून समोर आलं आहे. (Latest Marathi News)

लग्नाच्या पहिल्या रात्री व्यक्तीला कळालं की, त्याची बायको ही महिला नाही. त्यामुळे व्यक्तीने बायकोला रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. परंतु उपचारातून काहीच निष्पन्न झालं नाही. यानंतर या व्यक्तीने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. व्यक्तीच्या घटस्फोटाच्या अर्जावर कोर्टाने निर्णय दिला. या व्यक्तीचं ७ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.

व्यक्तीने ७ वर्षांपूर्वी केलं होतं लग्न

दरम्यान, पती-पत्नीचं हे प्रकरण एत्माद्दौला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. या व्यक्तीचं ७ वर्षांपूर्वी २७ जानेवारी २०१६ रोजी लग्न झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री कळालं की, त्याची बायको ही महिला नाही. तिचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे विकसित झालेला नाही. यामुळे हा व्यक्ती फार चिंतेत असायचा.

व्यक्तीने अनेक बड्या डॉक्टरांशी तिचा उपचार करण्यासाठी संपर्क केला. मात्र,उपाचारानंतर अनेक महिने उलटूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही. डॉक्टरांनी त्याला सांगितलं की, त्याची बायको केव्हाच आई बनू शकत नाही.

कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

पीडित व्यक्तीच्या माहितीनुसार, माझी बदनामी होईल, त्यामुळे मी कोणाला काही सांगितलं नाही. मात्र, काही दिवसांनी एका वकीलाच्या मदतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. या प्रकरणावर तब्बल ७ वर्षांनी कोर्टाने निर्णय दिला आहे. पुराव्याच्या आधारावर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT