Airplane Crash Saam
देश विदेश

Air India: शब्द पण फुटेना, डोळ्यात पाणी, याच विमानाने बहीण लंडनला निघाली होती, त्याआधीच कोसळलं; नातेवाईकांचा आक्रोश

Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात आज एक भीषण विमान अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या काही क्षणातच Air India चे प्रवासी विमान कोसळले आणि संपूर्ण परिसर हादरून गेला.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात आज एक भीषण विमान अपघात घडला. टेकऑफनंतर प्रवासी विमान कोसळलं, आणि क्षणात संपूर्ण परिसर हादरून गेला. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अपघातग्रस्तांना अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर रूग्णालयात प्रवाशांच्या कुटुंबीयांनी गर्दी केली आहे. आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

रूग्णालयात भावना पटेल या महिला आपल्या बहिणीचा शोध घेत होते. त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, 'माझी बहीण लंडनला जात होती. दुपारी १.१० वाजता तिची फ्लाईट होती, पण लंडनला पोहोचण्यापूर्वीच फ्लाईट क्रॅश झाली' अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ज्या भींतीवर विमान कोसळलं, त्या इमारतीत रमिला यांचा मुलगाही होता. "माझा मुलगा जेवणाच्या सुट्टीत हॉस्टेलमध्ये गेला होता आणि तिथेच विमान कोसळले. माझा मुलगा सुरक्षित आहे आणि मी त्याच्याशी बोलले आहे. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याला थोडी दुखापत झाली," अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

वहिनीला एअरपोर्टवर सोडायला आलेल्या दीराने आपली प्रतिक्रिया दिली, "माझी वहिनी लंडनला जात होती. तासाभरातच मला विमान कोसळल्याची बातमी मिळाली. म्हणून मी इथे आलो आहे, मला अजून रूग्णालयात एन्ट्री मिळाली नाही" गुजरातमधील अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचताना पूनम पटेल म्हणाले.

या अपघातग्रस्त विमानात एकूण २४२ प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील २३० प्रवासी होते. तर,१२ क्रू मेंबर होते. त्यांचाही शोध सुरू आहे. सध्या कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली असून, आपल्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाश

Maharashtra : ७ महिन्यात १४ लाख मतदार वाढले, विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपादरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर; VIDEO

Deepika Padukone: ८ तासांची शिफ्ट की ५ स्टार ट्रीटमेंट; दीपिका पदुकोणने नक्की का घेतली 'कल्कि २८९८ एडी'मधून एक्झिट

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे भव्य चिंतन शिबिर, ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग

SCROLL FOR NEXT