फेसबुकचे तालिबानवर सर्जिकल स्ट्राईक; तालिबानचे अकाऊंट्स केले ब्लॉक Saam Tv News
देश विदेश

फेसबुकचे तालिबानवर सर्जिकल स्ट्राईक; तालिबानचे अकाऊंट्स केले ब्लॉक

तालिबानला रोखण्यासाठी लोकप्रिय सोशल मीडिया साईट फेसबुकनं कंबर कसली आहे. तालिबानचा आणि तालिबानला समर्थन करणाऱ्या सर्वच प्रकारचा कंटेंट फेसबुकवरुन हटवण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून तालिबाननं दहशत माजवली आहे. ग्राऊंडपासून ते सोशल मीडिया सगळीकडेच तालिबानची दहशत पहायला मिळतेय. आपली दहशत पसरवण्यासाठी तालिबान समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. यापासून तालिबानला रोखण्यासाठी लोकप्रिय सोशल मीडिया साईट फेसबुकनं कंबर कसली आहे. तालिबानचा आणि तालिबानला समर्थन करणाऱ्या सर्वच प्रकारचा कंटेंट फेसबुकवरुन हटवण्यात येत आहे. (Facebook's surgical strike on Taliban; Blocked Taliban accounts)

हे देखील पहा -

अमेरिकन कायद्यानुसार हिंसक आणि दहशत पसरवणारे कृत्य करणाऱ्या गटांना दहशतवादी संघटना म्हणून काळ्या यादीत टाकले जाते. त्यानुसार तालिबानी कंटेंटला फेसबुकवरुन पुर्णपणे हटवण्यात येत आहे. शिवाय तालिबानी विचारधारेचे समर्थन करणाऱ्यांवरही फेसबुक कारवाई कारवाई करत आहे.

तालिबानचे फेसबुकवरील सर्व अकाऊंट्स ब्लॉक करण्यात येत आहे. शिवाय दारी आणि पश्तो भाषा अवगत असणारे अफगाणिस्तानमधील काही तज्ज्ञही फेसबुकनं नियुक्त केले आहेत. या भाषांमध्ये जर काही मजकुर फेसबुकवर टाकण्यात आला, तर ते ओळखून तातडीने काढून टाकण्यात येणार आहेत. इंग्रजी व्यतिरिक्त इतर कुठल्याही स्थानिक भाषेतून दहशतवादी विचार पसरवण्याचं काम केलं जाऊ शकतं. त्यासाठी तालिबानशी संबंधित सर्व स्थानिक भाषांमधील तज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने डोकं वर काढलं. अवघ्या १०३ दिवसांमध्ये तालिबानने संपुर्ण अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला. रविवारी १५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलही ताब्यात घेतली. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशातून पलायन केले. सध्या काबुलचे विमानताळ ५ हजार अमेरिकन सैनिकांनी ताब्यात घेतले असून अमेरिकन नागरिकांचे रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे. भारतानेही आपल्या नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी विमानं पाठवली आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Mumbai E Water Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गेटवे ते जेएनपीए ‘ई वॉटर टॅक्सी’ २२ सप्टेंबरपासून धावणार

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Navratri 2025: यंदा नवरात्र उत्सव कधीपासून आहे? तारीख अन् मुहूर्त जाणून घ्या

Gold Rate: सणासुदीत सोनं १ तोळ्यामागे २० हजारांनी वाढणार, वाचा तज्ज्ञांनी का वर्तवला अंदाज

SCROLL FOR NEXT