तालिबानच्या धमक्यांनंतरही पायलट बनण्याचे स्वप्न तिने पुर्ण केले

तालिबानच्या विरोधाला न जुमानता २०११ मध्ये निलोफर अफगाणिस्तान हवाई दलात सामील झाल्या
तालिबानच्या धमक्यांनंतरही पायलट बनण्याचे स्वप्न तिने पुर्ण केले
तालिबानच्या धमक्यांनंतरही पायलट बनण्याचे स्वप्न तिने पुर्ण केले

एकीकडे तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afganistan) कब्जा केला आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून महिलांवरील अत्याचाराच्या सातत्याने बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानी अफगाणी महिलांना ओलिस घेऊन जबरदस्तीने लग्न करत आहेत. तालिबानचा राजवट अफगाणिस्तानच्या महिलांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जाते. मात्र या सगळ्या दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला पायलट राहिलेल्या महिलेची गोष्ट सांगणार आहोत. यावेळी त्या अमेरिकेत आहेत आणि दोन दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

निलोफरने एअरफोर्स युनिफॉर्म घातला

तालिबानी राजवटीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने अनेकदा अफगाणिस्तानातील महिलांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पण गेल्या दोन दशकांत अशी अनेक व्यक्तिमत्त्वे इथे उदया आली आहेत ज्यांनी देशाच्या इतिहासात आपापल्या पद्धतीने आपली नावे नोंदवली आहेत. यापैकी एक नाव आहे निलोफर रहमान (Niloofar Rahmani), ज्यांनी अफगाण हवाई दलात भरती होऊन नवा इतिहास रचला. निलोफर यांनी तालिबानच्या प्रत्येक धमकीकडे दुर्लक्ष केले आणि ध्येय साध्य केले जे आज अफगाणिस्तानातील प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे.

तालिबानच्या धमक्यांनंतरही पायलट बनण्याचे स्वप्न तिने पुर्ण केले
धक्कादायक! कोरोनाला घाबरून दांपत्याची आत्महत्या

युद्ध दरम्यान जन्म झाला

२९ वर्षीय निलोफर अफगाणिस्तान हवाई दलाच्या इतिहासातील पहिल्या महिला फिक्स्ड विंग पायलट आहेत. 1992 मध्ये अफगाणिस्तानात जन्मलेल्या निलोफर यांचे लहानपणापासूनच वैमानिक बनण्याचे स्वप्न होते. ज्या वेळी निलोफरचा जन्म झाला, त्या वेळी अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युद्ध चालू होते.२०११ मध्ये, जेव्हा निलोफरने सेकंड लेफ्टनंट म्हणून अफगाण हवाई दलात सामील झाल्या तेव्हा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला तालिबानकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. पण त्यांच्या कुटुंबांने आणि निलोफर यांनी हिंमत न हरता आपल कर्तव्य पार पाडत राहिल्या.

अमेरिकेनेही या धाडसाला सलाम केला

त्याचे वडीलही अफगाण हवाई दलात होते. निलोफर यांनी दोन महिला वैमानिकांना आपल्या वडिलांसोबत विमान उडवताना पाहिले होते आणि तेव्हापासून त्यांच्या मनातही वैमानिक होण्याचे स्वप्न फुलू लागले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निलोफरने दिवसरात्र कष्ट केले, सुमारे एक वर्ष इंग्रजीचा अभ्यास केला. निलोफर यांनी कोणत्याही किंमतीत फ्लाइट स्कूलमध्ये प्रवेश मिळण्याची संधी सोडायची नव्हती.

2001 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानचा पूर्णपणे नायनाट झाला तेव्हा निलोफरच्या स्वप्नाला पंख मिळू लागले. तालिबानकडून धमक्या मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण त्यानंतरही ती कठोर परिश्रम करत राहिली. 2015 मध्ये, त्यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला धैर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निलोफर सैनिकांचे मृतदेह घेऊन जायचे

निलोफर 18 वर्षांची असताना, अफगाण हवाई दलाने महिलांची भरती करण्याचा कार्यक्रम सुरू केला. 2011 मध्ये, निलोफर आपल्या कुटुंबाच्या मदतीने हवाई दलात भरती झाल्या. निलोफर प्रशिक्षण घेत असताना वॉल स्ट्रीट जनरलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, अफगाणिस्तानातील महिलांना हा अधिकार असायला हवा. त्याचबरोबर त्यांनी उर्वरित महिलांनाही अशा प्रकारे पुढे येण्याचे आवाहन केले. अफगाणिस्तानातील महिला वैमानिकांना कोणत्याही जखमी किंवा मृत सैनिकांची वाहतूक करण्याचे स्वातंत्र्य नाही. पण जेव्हाही निलोफरला ऑर्डर मिळाली, तेव्हा त्यांनी ती नेहमी पूर्ण केली आणि कधीही संकोच दाखवला नाही.

तालिबानच्या धमक्यांनंतरही पायलट बनण्याचे स्वप्न तिने पुर्ण केले
Girl commits suicide in Pune | अकराव्या मजल्यावरून उडी मारून पुण्यात तरुणीची आत्महत्या,पाहा व्हिडिओ

दहशतवादाने स्वप्न भंगले

सी -130 जे हर्क्युलस वाहतूक विमान उडवण्याचे निलोफर यांचे स्वप्न होते. हे जगातील सर्वात प्रगत वाहतूक विमान आहे. पण निलोफरचे स्वप्न भंगले आणि त्यांना अफगाणिस्तान हवाई दलाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कुटुंबाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. निलोफर यांच्या वडिलांना सांगण्यात आले की, त्यांच्या मुलीची लष्करी कारकीर्द देशातील उर्वरित महिलांसाठी धोकादायक बनली आहे. यानंतर त्याच्या वडिलांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सध्या निलोफर अमेरिकेतील फ्लोरिडाच्या टांपा येथे राहतात.

आता निलोफर अमेरिकेत अनुवादक आहे

2018 मध्ये निलोफर आणि त्यांच्या अमेरिकेने आश्रय दिला. सध्या त्याची बहीण अफसून देखील अमेरिकेत आश्रयासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिका त्यांच्यासाठी सुरक्षित असल्याचे निलोफर सांगतात. मा६ या सुरक्षिततेची जाणीव असूनही, त्यांना आपले स्वप्न गमावल्याने दुःख झाले आहे. या स्वप्नाने त्यांना आकाशात उडण्यास शिकवले. निलोफर सध्या फ्लोरिडामध्ये अनुवादक म्हणून काम करताच. फारसी, दारी आणि इंग्रजी या तीन भाषा बोलण्यात पारंगत असलेल्या निलोफर यांना आता अमेरिकन हवाई दलासाठी विमान उडवण्याचे स्वप्न आहे. हे पूर्ण करण्यासाठी त्यांना अमेरिकेचे नागरिक असणे आवश्यक आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com