Meta Fined Record €1.2 Billion  Saam Tv
देश विदेश

Meta Fined: मार्क झुकरबर्ग 'मेटाकुटी'ला, पॅरंट कंपनीची चूक महागात पडली, दंड एवढा की डझनभर कंपन्या उभ्या राहतील

मार्क झुकरबर्ग 'मेटाकुटी'ला, पॅरंट कंपनीची चूक महागात पडली, दंड एवढा की डझनभर कंपन्या उभ्या राहतील

Satish Kengar

Meta Fined Record €1.2 Billion: फेसबुकची पॅरंट कंपनी मेटाला (Meta) आतापर्यतचा सर्वात मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड इतका मोठा आहे की, मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) इतक्या रकमेत अनेक मोठ्या कंपनी उभ्या करू शकला असता.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, मेटाला युरोपियन संघाने तब्बल 1.2 अब्ज युरोचा दंड ठोठावला आहे. भारतीय चलनात ही रकम भारतीय चलनात सुमारे 10,765 कोटी रुपये इतकी आहे. इतर देशांतील फेसबुक-इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा अमेरिकेत पाठवल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी अ‍ॅमेझॉनला सर्वाधिक 821.20 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र आता हा रेकॉर्ड तुटला आहे.

काय आहे प्रकरण?

आयर्लंडच्या डेटा संरक्षण आयुक्त हेलन डिक्सन यांच्या नेतृत्वाखालील युरोपियन संघाने फेसबुकद्वारे युरोपियन युजर्सचा डेटा ट्रान्सफर करण्यावर बंदी घातली आहे. कारण अमेरिकेची गुप्तचर संस्था या माहितीमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्याचा वापर करू शकतात.

हेलन डिक्सन यांनी मागील महिन्यात सांगितलं होतं की, आयरिश डीपीसीकडे फेसबुकच्या ट्रान्सअटलांटिक डेटा ट्रान्सफरला ब्लॉक करण्यासाठी एक महिना आहे. आता असे बोलले जात आहे की, मे अखेरपर्यंतही बंदी लागू होऊ शकते. त्यानंतर फेसबुक यूजर्सचा डेटा ट्रान्सफर करू शकणार नाही. (Latest Marathi News)

दरम्यान, युरोपच्या सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये पाळत ठेवत इयू- यूएस डेटा ट्रान्सफर करार अवैध असल्याचा निर्णय दिला होता. मेटाला गेल्या वर्षी देखील ट्रान्सफरबाबत इशारा देण्यात आला होता. त्यानंतर फेसबुकची सेवा युरोपमध्ये बंद करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT