‘फेसबुक’ने आपलं नाव बदललं; 'हे' असणार नवीन नाव  Saam Tv
देश विदेश

‘फेसबुक’ने आपलं नाव बदललं; 'हे' असणार नवीन नाव

भारतीय वेळेनुसार ही घोषणा मध्यरात्री करण्यात आली.

वृत्तसंस्था

सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. आता फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. असे असले तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे तीच राहणार आहेत. जुकरबर्गने गुरुवारी फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा केली. भारतीय वेळेनुसार ही घोषणा मध्यरात्री करण्यात आली.

हे देखील पहा -

फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी हे फेसबुकचे नवीन नाव ‘मेटा’ सुचवले होते. यापूर्वी 2005 मध्ये फेसबुकने असेच काही केले होते, २००५ मध्ये TheFacebook वरून Facebook असे बदलले होते. 3 अब्जाहून अधिक लोक जगभरात फेसबुक वापरतात. तर भारतात फेसबुक वापरणाऱ्या नागरिकांची संख्या 41 कोटी इतकी आहे.

फेसबुकच्या या घोषणेमुळे ओरिजनल अॅप आणि सर्विस जी सुरू आहेत ती कायम राहणार आहे. त्यात काही बदल होणार नाही. या कंपनीची री-ब्रँडिंग आहे आणि कंपनीचे बाकी प्रॉडक्ससारखे व्हॉट्सअॅप आणि इन्स्टांग्रामला कंपनीच्या नव्या लेबल अंतर्गत आणण्याची योजना असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

नाव बदलल्यासह कंपनीत रोजगार देखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मेटावर्ससाठी त्यांना हजारो लोकांची गरज आहे अशी घोषणा कंपनीने केली होती. सध्या कंपनी 10 हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे.

फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना नवीन बाजारपेठा, नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स, आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशी आशा मार्केटमध्ये आहे. मेटाव्हर्समध्ये व्हर्च्युअल वातावरणात ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल तसेच संभाषण देखील साधता येईल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश.

C. P. Radhakrishnan यांनी दिला राज्यपालपदाचा राजीनामा, बनले भारताचे नवे उपराष्ट्रपती

Dead Snake In Ration Rice: बापरे! रेशनच्या तांदळात आढळला मेलेला साप; चार दिवस खाल्ल्यानंतर...; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या अक्षेपार्ह फोटो प्रकरणी हायकोर्टाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण जाणून घ्या

Maharashtra Tourism: वीकेंडला कुठं जावं? शांत, सुंदर आणि निवांत…; नागपूरमधील 'ही' ठिकाणं पिकनिकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT