भाजपने काढलेल्या आसूड मोर्चा विरोधात आयोजकांसह 800 जणांवर गुन्हे दाखल...

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोरोना विषयक नियमांचा या मोर्चामुळे भंग झाला.
भाजपने काढलेल्या आसूड मोर्चा विरोधात आयोजकांसह 800 जणांवर गुन्हे दाखल...
भाजपने काढलेल्या आसूड मोर्चा विरोधात आयोजकांसह 800 जणांवर गुन्हे दाखल...संजय जाधव
Published On

बुलढाणा - जिल्ह्यात २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान भाजपने विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आसूड मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व कोरोना विषयक नियमांचा या मोर्चामुळे भंग झाला. त्यामुळे चिखली, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर येथील भाजप नेते, शेतकऱ्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

हे देखील पहा -

काल रोजी बुलडाणा शहरातही योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला होता. रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात मोर्चा आयोजकांसह तब्बल ७०० ते ८०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नेते योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात जिजामाता प्रेक्षागार, संगम चौक, जयस्तंभ स्तंभ, कारंजा चौक, गर्दे हॉल चौकमार्गे आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता.

भाजपने काढलेल्या आसूड मोर्चा विरोधात आयोजकांसह 800 जणांवर गुन्हे दाखल...
राज्यपालांकडून आदर्शगाव हिवरेबाजार चे कौतुक!

हजारो शेतकरी सहभागी झालेल्या या मोर्चाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले व साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी चक्क 800 जणांवर विविध कलमांव्ये गुन्हे दाखल केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com