हाडं गोठवणारी थंडी, घराबाहेर पडलेलं दाट धुकं आणि सगळीकडे पसरलेला हा बर्फ...हे दृश्य आहे रशियाच्या सायबेरियातलं...इथं तापमानाचा पारा उणे 56 अंशांवर पोहचलाय. याकूतियातील टिकसी या किनारी गावात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. हिमवृष्टी आणि वेगवान वाऱ्यांमुळे संपूर्ण गाव बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकलं गेलय. अनेक घरांच्या दारांपर्यंत बर्फ साचल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले असून, अनेकजण घरातच अडकून पडले आहेत
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरून -60 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याकूतिया हा प्रदेश जगातील सर्वात थंड वस्ती असलेल्या भागांमध्ये गणला जातो.
इथं हिवाळ्यात तापमान साधारणतः -40 ते -50 अंश सेल्सियस दरम्यान असते, तर काही वेळा ते -60 अंशांपर्यंतही घसरतं. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालय. शाळा-कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. रस्ते बंद झाले असून, दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवणंही कठीण झाले आहे. प्रशासन आणि आपत्कालीन सेवा बर्फ हटवण्याचं काम करतय, मात्र जोरदार वाऱ्यांमुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याकूतियात थंडी नवीन नाही, मात्र यंदाच्या थंडीने आणि हिमवादळाने जनजीवन अक्षरशः गोठवून टाकलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.