how to make lpg gas Saam t
देश विदेश

Explainer : जगात सर्वाधिक गॅसचे उत्पादन कोणता देश करतो? कसा तयार केला जातो स्वयंपाकाचा गॅस?

how to make lpg gas : एलपीजी गॅसमुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे. स्वयंपाकाचा हा गॅस कसा तयार केला जातो, हे जाणून घ्या.

Vishal Gangurde

अमेरिका हा जगातील सर्वाधिक एलपीजी गॅस उत्पादन करणारा देश

एलपीजी गॅस हा कच्च्या तेलाच्या रिफायनिंग आणि नैसर्गिक वायू प्रक्रियेदरम्यान होता तयार

प्रोपेन आणि ब्युटेन या दोन्ही गॅसपासून एलपीजी तयार होतो

इस्त्रायल-इराणच्या युद्धामुळे जगाचे टेन्शन वाढलं आहे. युद्धाचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर झाल्याचे दिसत आहे. भारतातील अनेक शहरात गॅसची टंचाई होत असल्याचा दावा केला जात आहे. महायुद्धाची झळ महाराष्ट्रालाही बसायला सुरुवात झाली आहे. घराघरात लागणाऱ्या या स्वयंपाकाच्या गॅसचे उत्पादन कोणत्या देशात सर्वाधिक होते, ते कशा प्रकारे केले जाते, जाणून घेऊयात.

अमेरिका जगातील सर्वाधिक एलपीजी उत्पादक देश आहे. एलपीजीचे उत्पादन हे कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान आणि नैसर्गिक वायूची प्रक्रिया करताना उपउत्पादन म्हणून करण्यात येते. त्यानंतर रिफायनरीत कच्चे तेल शुद्ध करताना अनेक प्रकारचे वायू बाहेर पडतात. त्यानंतर हे वायू वेगळे करून साठवण्यात येतात. या वायूपैकी एलपीजी हा एक महत्वाचा गॅस आहे.

अमेरिका आधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या रिफायनरीच्या नेटवर्कच्या माध्यमातून जगभरात गॅसचा पुरवठा करतात. सध्याच्या युद्धाच्या स्थितीत अमेरिकेसारख्या उत्पादक देशांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे.

गॅस कसा तयार केला जातो?

एलपीजी गॅस हा दोन प्रमुख गॅस एकत्र करून तयार केला जातो. यात प्रोपेन आणि ब्युटेन गॅसचा समावेश आहे. दोन्ही गॅस कच्च्या तेलाच्या रिफायनिंग आणि नैसर्गिक गॅसच्या प्रक्रियेदरम्यान वेगवेगळे केले जाते. कच्च्या तेलाला रिफायनरीमध्ये उच्च तापमानावर गरम केलं जातं. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचा गॅस तयार होतो. यातील प्रोपेन आणि ब्युटेन गॅसला एकत्र करून त्याचे रुपांतर द्रव्य रुपात (लिक्विड) केले जाते. यामुळे त्याला 'लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस' म्हटले जाते.

या एलपीजी गॅसचा सुरक्षितरित्या पुरवठा केला जातो. गॅसला अधिक प्रमाणात दाब दिल्यानंतर त्याचे रुपांतर लिक्विडमध्ये होते. यामुळे कमी जागेत जास्त गॅसची साठवणूक केली जाते. सिलिंडरमधील लिक्विडचे रेग्युलेटर चालू केल्यानंतर गॅसमध्ये रुपांतर होते. या गॅसच्या आधारे घरात जेवण तयार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT