Explainer On COVID 19 JN.1 Variant Saam Tv
देश विदेश

Explainer: कोरोना व्हायरसचा JN.1 प्रकार किती धोकादायक? यापासून बचावासाठी काय करावं?

COVID 19 JN.1 Variant: देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रविवारी देशभरात 335 नवे रुग्ण आढळले आहेत.

Satish Kengar

Explainer On COVID 19 JN.1 Variant:

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रविवारी देशभरात 335 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1700 च्या वर गेली आहे.

कोरोनामुळे एकाच दिवसात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच केरळमध्ये कोरोना विषाणूच्या JN.1 प्रकाराचीही नोंद झाली आहे. केरळमधील 79 वर्षीय महिलेमध्ये हे आढळून आले आहे. या महिलेला इन्फ्लूएंझा सारखी आजाराची लक्षणे होती. याआधीही तिला कोरोना झाला होता पण त्यातून ती बरी झाली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोनाच्या JN.1 प्रकाराची जगातील पहिले प्रकरण युरोपियन देश लक्झेमबर्गमध्ये आढळून आले. यानंतर कोरोनाचा हा उपप्रकार इंग्लंड, आइसलँड, फ्रान्स, अमेरिका आणि चीनमध्ये आढळून आला. भारतात त्याचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झालेआहेत. यापासून बचावासाठी रुग्णालयांमध्ये तयारी सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉक ड्रिलही घेण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

नवीन प्रकाराबद्दल विविध गोष्टी बोलल्या जात आहेत. यातच कोरोनाचा हा प्रकार किती धोकादायक आहे आणि त्याबद्दल आपण कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, JN.1 प्रकारला पिरोला असेही म्हणतात, जे ओमिक्रॉनपासून येते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या नवीन प्रकारांबद्दल घाबरण्याची गरज नाही. खबरदारी घेतल्यास यापासून बचाव करणं शक्य आहे.

किती धोकादायक आहे JN.1?

फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडिया आणि ऑर्गनाइज्ड मेडिसिन अकॅडेमिक गिल्ड-ओएमएजीचे सरचिटणीस डॉ. ईश्वर गिलाडा यांनीही सांगितले की, कोरोनाचा नवीन प्रकार JN.1 मध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांनी सांगितले की, यामुळे कोणत्याही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही आणि कोणालाही आयसीयूमध्ये दाखल करण्याची अद्याप गरजही भासली नाही. याची लागण झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनच्या आधारावर ठेवण्याचीही अद्याप गरज पडलेली नाही.

सावध राहणं गरजेचं

दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ. उज्ज्वल प्रकाश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सतर्क राहणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही. आरोग्य तज्ज्ञ डॉ. निरोज मिशा यांनीही असेच काहीसे सांगितले आहे. ते म्हणाले की, JN.1 प्रकार हा सौम्य आजार आहे. त्याची लक्षणे अतिशय सौम्य आहेत आणि फक्त 0.5 टक्के लोकांनाच मदतीची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Pakoda Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

High Court Notice To BCCI: आईशप्पथ, खेळाडूंनी फस्त केली ३५ लाखांची केळी, बीसीसीआयचा बीपी वाढला; हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

Pitru Paksha 2025: पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी दिवा कोणत्या दिशेला लावावा?

Maharashtra Live News Update : मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी, उदगीरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

SCROLL FOR NEXT