IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Rohit Sharma Shreyas Iyer Stump Mic Chat: अॅडिलेड वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांमधील तू तू मै मै स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
Rohit Sharma Shreyas Iyer Stump Mic Chat
IND vs AUSgoogle
Published On

अॅडिलेड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे रंगला. नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली नव्हती. कर्णधार शुभमन गिल ९ धावांवर तर किंग कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी संयम दाखवत डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची जबरदस्त भागीदारी केली. भागादारीदरम्यान, दोघांमध्ये वाद झाला,यावेळी झालेला संभाषण स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड झालं. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रोहित-श्रेयसचा वाद स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड

१४ व्या ओव्हरमध्ये जोश हेजलवूडचा बॉल रोहितच्या पॅडवर आदळला आणि तो ऑफ साइडला गेला. येथे रोहितला एक धाव घेण्याची संधी दिसली, परंतु नॉन स्ट्रायकर एन्डवरील अय्यरने कॉल दिला नाही. यानंतर रोहितने आणि श्रेयसमध्ये झालेली चर्चा स्टंम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाली. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील संभाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करतो, पण अय्यर नकार देतो.

नेमकं काय बोलणं झालं?

रोहित शर्मा- ए श्रेयस, तो एक सिंगल होता.

श्रेयस अय्यर - अरे, तू करुन बघ मला नको बोलूस

रोहित शर्मा- तुला कॉल द्यावा लागेल ना. तो सातवी ओव्हर टाकत आहे.

अय्यर म्हणतो- मला त्याचा अँगल माहित नाही. तू कॉल दे.

रोहित शर्मा- मी कॉल नाही देऊ शकत.

श्रेयस अय्यर- अरे तो तुझ्या समोर आहे.

Rohit Sharma Shreyas Iyer Stump Mic Chat
IND vs AUS: सामना हरला, मालिकाही गमावली; एकही धाव न घेता ऑस्ट्रेलिया जिंकली, अर्शदीपच्या गोलंदाजीवर नेमकं काय घडलं?

अॅडिलेड वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करत टीम इंडियाने रोहित आणि अय्यर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ५० षटकांत ९ बाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 46. 2 ओव्हरमध्येच लक्ष्य गाठत भारतावर दणदणीत विजय मिळवला आणि वनडे सीरीजही जिंकली. या सामन्यात रोहित शर्माने ५९ वे अर्धशतक झळकावत ७४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. श्रेयस अय्यरनेही ७७ बॉल्समध्ये सात चौकारांसह ६१ धावा केल्या. अय्यरने रोहितला चांगली साथ दिली आणि भारताने ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

Rohit Sharma Shreyas Iyer Stump Mic Chat
Sarfaraz Khan: 'खान' आडनावामुळे खेळाडूला डच्चू; सरफराजच्या सिलेक्शनवरून वाद पेटला, औवेसीनंतर काँग्रेस नेत्याचे गौतमवर 'गंभीर' आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com