Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : मंकीपॉक्स खरंच मासांहारातून पसरतो का? पोलिओशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर

Monkeypox Virus : कोरोना महामारीनंतर आता मंकीपॉक्सने डोकं वर काढलं असून WHO नेही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या व्हायरसचा प्राण्यांशी थेट संबंध असल्याचं संशोधनात समोर आलं आहे.

Sandeep Gawade

सार्स 2003 साली आला, 2009 साली मर्स आणि H1N1 स्वाइन फ्लू पसरला. इबोलाही वेळोवेळी पसरत असतो. झिका व्हायरस देखील अजून गायब झालेला नाही. 2019 च्या शेवटी कोविड पसरला आणि हे संकट टळत न टळत तोच आता मंकीपॉक्सने डोकं वर काढलं आहे. गेल्या १५-२० वर्षात या सर्व व्हायरसनी जगभरात उच्छात माजवला आहे. या सर्वांचा स्रोत एकच होता, आणि तो म्हणजे प्राणी.

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अंदाज आहे की दरवर्षी 1 अब्जपेक्षा जास्त लोक प्राण्यांमुळे पसरलेल्या व्हायरसमधून आजारी पडतात. यात लाखो लोकांचा मृत्यू होतो. WHO ने असंही म्हटलं आहे, की गेल्या तीन दशकांत माणसांमध्ये 30 प्रकारचे नवीन आजारांचं निदान झालं आहे. त्यापैकी 75% प्राण्यांमुळे पसरले आहेत. मासांहार किंवा बंदिस्त ठेवलेल्या प्राण्यांमधून यांचं संक्रमण होत असल्याचं समोर आलं आहे.

मंकीपॉक्सचा माकडांशी काय संबंध आहे?

1950 च्या दशकात पोलिओ हा एक धोकादायक आजार बनत चालला होता. शास्त्रज्ञ त्याच्या लसीवर काम करत होते. लसीच्या चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात माकडांची गरज होती. हे माकडं प्रयोगशाळेत ठेवण्यात आले. अशीच एक प्रयोगशाळा डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये होती. 1958 साली इथे प्रयोगशाळेत ठेवलेल्या माकडांमध्ये एक विचित्र आजार आढळला. या माकडांच्या शरीरावर देवीसारखे पुरळ उठले होते. हे माकडं मलेशियाहून कोपेनहेगनमध्ये आणण्यात आले होते. जेव्हा या माकडांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्यात एक नवीन व्हायरस सापडला आणि या व्हायरसला मंकीपॉक्स नाव देण्यात आलं .

1958 ते 1968 च्या दरम्यान आशियातून आलेल्या शेकडो माकडांमध्ये अनेक वेळा मंकीपॉक्स व्हायरस आढळला. त्या वेळी शास्त्रज्ञांना असं वाटलं की हा व्हायरस आशियातून पसरत आहे. पण जेव्हा भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि जपानमधील हजारो माकडांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यांच्यात मंकीपॉक्सविरुद्ध अँटीबॉडी सापडली नाही. यामुळे शास्त्रज्ञ चकित झाले, कारण वर्षानुवर्षं झाल्यानंतरही ते या व्हायरसच्या मूळ स्रोताचा शोध घेऊ शकले नाहीत.

माणसांमध्ये निदान कधी झालं?

1970 मध्ये जेव्हा पहिल्यांदा एक माणूस यामुळे संक्रमित झाला. तेव्हा काँगोमध्ये राहणाऱ्या 9 महिन्यांच्या मुलाच्या शरीरावर पुरळ उठले होते. हा प्रकार आश्चर्यकारक होता, कारण 1968 मध्ये इथे देवी पूर्णपणे संपुष्टात आली होती. नंतर जेव्हा या मुलाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यात मंकीपॉक्सची पुष्टी झाली.

या देशात आहे व्हायरसचं मूळ

एखाद्या माणसाच्या मंकीपॉक्सने संक्रमित होण्याचा पहिला प्रकार समोर आल्यानंतर अनेक आफ्रिकन देशांमध्ये माकडं आणि खारुताई यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्यात मंकीपॉक्सविरुद्ध अँटीबॉडी सापडली. यावरून शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला की मंकीपॉक्सचा मूळ स्रोत आफ्रिकाच आहे. आफ्रिकेतूनच हा व्हायरस आशियातील माकडांमध्ये पसरला असावा.

अमेरिकेत कुत्र्यापासून झाली लागण

यानंतर काँगो व्यतिरिक्त बेनिन, कॅमेरून, गॅबन, लायबेरिया, नायजेरिया, दक्षिण सुदान यांसारख्या अनेक आफ्रिकन देशांत माणसांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचे अनेक प्रकार आढळून आले. 2003 साली पहिल्यांदा हा व्हायरस आफ्रिकेबाहेर पसरला, त्यावेळी अमेरिकेत एक रुग्ण आढळला. त्याला हे संक्रमण पाळीव कुत्र्यामुळे झालं होतं. हा कुत्रा घाना या आफ्रिकन देशातून आणण्यात आला होता. नंतर सप्टेंबर 2018 मध्ये इस्रायल, मे 2019 मध्ये युके, डिसेंबर 2019 मध्ये सिंगापूर यांसारख्या देशांत देखील याची प्रकरणं समोर आली. आता भारतातही एका रुग्णात मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. मात्र, 50 वर्षांनंतरही मंकीपॉक्सच्या संक्रमण आणि प्रसाराबाबत संशोधन सुरू आहे.

WHO च्या मते, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसात पसरतो. मंकीपॉक्स एक दुर्मिळ आजार आहे, जो मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू त्या वॅरिओला विषाणू जातीतीचा भाग आहे, ज्यामुळे चेचक होतो. मंकीपॉक्सची लक्षणे चेचकासारखीच असतात. मंकीपॉक्स क्वचितच प्राणघातक ठरतो. कोरोनाव्हायरस विषयी असं मानले जातं की तो वटवाघुळ किंवा पँगोलिनपासून पसरला असावा. मंकीपॉक्स बाबतीत असे ठोस पुरावे नाहीत, पण सिंगापूरच्या खाद्य एजन्सीच्या मते, अफ्रिकेतून आलेल्या मांसामुळे मंकीपॉक्स पसरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्स ऐकून माकडांपासून घाबरायची गरज नाही, कारण एकदा माणसांमध्ये विषाणूचा शिरकाव झाला की प्राण्यांची भूमिका फार कमी होते.

मासांहारामुळे धोका वाढतो का?

काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली होती की कोविड ही शेवटची महामारी नाही. भविष्यात आणखी महामार्‍या येऊ शकतात. म्हणूनच आपल्याला प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या आजारांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 2013 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या एका अहवालात म्हटले होते की "लाइव्हस्टॉक हेल्थ" म्हणजे आपली ग्लोबल हेल्थ चेन सर्वात कमजोर दुवा आहे.

एका अहवालात म्हटले आहे, की जगातील 90 टक्के पेक्षा जास्त मांस फॅक्टरी फार्ममधून येते. या फार्ममध्ये प्राण्यांना गच्च भरून ठेवलं जातं, ज्यामुळे व्हायरल आजारांचा धोका वाढतो. एका रिपोर्टनुसार, जगभरात अंदाजे 12 अब्ज एकर जमीन शेतीसाठी वापरली जाते, त्यातील 68 टक्के जमीन प्राण्यांसाठी वापरली जाते. जर सगळेजण शाकाहारी झाले, तर 80 टक्के जमीन प्राण्यांसाठी आणि जंगलांसाठी वापरता येईल. बाकी 20 टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाईल. कारण सध्या जितकी जमीन शेतीसाठी वापरली जाते, त्यातील एक-तृतीयांश जमीन जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरली जाते.

आता प्रश्न असा आहे की मग आपल्याकडे पुरेसे अन्नधान्य असेल का? याचे उत्तर 'हो' आहे. PETA च्या मते, अन्नासाठी प्राण्यांचा वापर करणे हा एक तोटाच आहे, कारण प्राणी खूप मोठ्या प्रमाणात अन्न खातात आणि त्याबदल्यात कमी प्रमाणात मांस, अंडी किंवा डेअरी उत्पादने मिळतात. एका प्राण्यापासून 1 किलो मांस मिळवण्यासाठी त्याला 10 किलो अन्न द्यावं लागतं. वर्ल्डवॉच इन्स्टिट्यूटच्या मते, आपण अशा जगात आहोत, जिथे प्रत्येक सहा व्यक्तींमध्ये एक व्यक्ती उपाशी असते, कारण मांस उत्पादनात अन्नधान्याचा अपव्यय होतो. जर माणूस थेट अन्नधान्य खाल्ले तर त्याचा चांगला उपयोग होईल.

फक्त एवढेच नाही, तर शाकाहारी आहार आर्थिक दृष्ट्या देखील फायदेशीर ठरतो. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात वैज्ञानिकांनी अंदाज वर्तवला होता की जर बहुतेक लोकांनी नॉन-व्हेज खाणं सोडलं, तर 2050 पर्यंत 31 ट्रिलियन डॉलर (2600 लाख कोटी रुपये) वाचवता येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT