INDIA Alliance  Saam Tv
देश विदेश

Explainer: लालू प्रसाद यादव-नितीश कुमार खरगेंच्या नावावर नाराज? I.N.D.I.A आघाडीचं काय होणार?

Bharat Jadhav

INDIA Alliance Meeting In Delhi Lalu prasad yadav Nitish Kumar Upset?:

देशाच्या सत्तेवर विराजमान असलेल्या मोदी सरकाराला खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी 'इंडिया' नावाची आघाडी तयार केलीय. मात्र त्यांच्यातील अंतर्गत वाद अद्याप मिटलेले नाहीत. यामुळेच या आघाडीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज दिल्ली येथे या आघाडीची चौथी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाची चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव समोर आले. (Latest News)

२८ पक्षांपैकी १६ राजकीय पक्षांनी खरगे यांना नेता म्हणून निवडलं. त्यांच्या नावाला पसंती दिली. आघाडीच्या समन्वयकपदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांचं नाव घेतलं. बॅनर्जी यांच्या निवडीला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला. मात्र हा निर्णय लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना आवडला नसल्याचं दिसतंय. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी उघड विरोध केलेला नाही, मात्र हे दोन्ही नेते पत्रकार परिषदेपूर्वीच तेथून निघून गेले. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच हे दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला पाठ दाखवली असल्याचं म्हटलं जात आहे. बैठक संपण्यापूर्वीच दोन्ही नेते निघून गेले. भाजप खासदार गिरीराज सिंह यांनीही या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधलाय. हे दोन्ही नेते का नाराज आहेत? आघाडीचं काय होणार असे प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत.

का आहेत नाराज ?

जाणकारांच्या मते, हे दोन्ही नेते विविध कारणांमुळे खरगे किंवा अन्य विरोधी पक्षनेत्याला या पदासाठी मान्यता देणार नाहीत. मान्यता का देणार नाहीत हे आपण जाणून घेऊ. खरं तर नितीश कुमार यांना हे पद हवं आहे, अशी त्यांची अपेक्षा असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु त्यांनी आपली अपेक्षा कधीच उघडपणे जाहीर केलेली नाही. मात्र आज मंगळवारी झालेल्या बैठकीनंतरच्या घटनेमुळे चित्र स्पष्ट झालं.

दरम्यान नितीशकुमार यांना बिहारमधील प्रादेशिक राजकारण सोडून केंद्रातील मोठी जबाबदारी घ्यायची आहे, अशी चर्चा बिहारमध्ये होत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. विशेष म्हणजे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची अपेक्षा आहे. परंतु पंतप्रधान मोदींची प्रचंड लोकप्रियता आणि भाजपकडे असलेला जनाधार पाहता एकट्या नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पोहोचणं शक्य नाहीये. पीएम पदाची खुर्ची घेण्याचं स्वप्न एकट्यानं पूर्ण होणार नसल्याने त्यांना 'इंडिया' आघाडीचे समन्वयक नेते व्हायचं आहे. या पदाच्या मार्गाने ते पंतप्रधान होऊन शकतात. ते आघाडीचे समन्वयक राहिले आणि लोकसभेत 'इंडिया' आघाडीने विजय मिळवला, तर त्यांना पंतप्रधान पदासाठी तडजोड करता येईल.

लालू प्रसाद यादव का आहेत नाराज?

दुसरीकडे लालू यादव हे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचा पक्ष आरजेडीकडे बहुमत नाहीये. या गोष्टीमुळे विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असताना सुद्धा तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर समाधानी राहावं लागत आहे. यामुळे जर नितीश कुमार हे आघाडीचे समन्वयक झाले तर ते देशात सक्रीय होतील. म्हणजे त्यांचा केंद्रात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. हे गणित समजलं तर लाल प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतो. या मोबदल्यात ते आरजेडीला लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देतील.

हे झालं नाही तर गणित चुकणार

खरगे इंडिया आघाडीचे समन्वयक झाले तर नितीश आणि लालू दोघांचे हे स्वप्नभंग होऊ शकते. यामुळेच त्यांनी बैठक संपल्यानंतर लगेचच बाहेर पडून काँग्रेसला नाराजीचे संकेत दिलेत का असा प्रश्न केला जात आहे. आघाडीतील एकता टिकवायची असेल तर जर खरगेंनी या पदाचा त्याग केला तर नितीशकुमार यांचा मार्ग मोकळा होईल. त्यांच्या लालप्रसाद यादव यांचे स्वप्नही पूर्ण होणं सोपं होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT