Bangladesh New Government Saam Digital
देश विदेश

Explainer : बांगलादेशचं नवीन सरकार भारताच्या दोन्ही शत्रूंच्या प्रेमात? भारतासाठी किती धोका?

Sandeep Gawade

शेख हसीना यांच्या हातून बांगलादेशची सत्ता जाऊन एक महिना उलटला आहे. या एक महिन्याच्या काळात बांगलादेशात प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, ज्यात बांगलादेशचं नवीन अंतरिम सरकार आणि महत्त्वाच्या पक्षांनी पाकिस्तान आणि चीनसोबत संबंध मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. १ सप्टेंबर रोजी बांगलादेशमधील पाकिस्तानचे उच्चायुक्त सैयद अहमद यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील मंत्री नाहिद इस्लाम यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर जर बांगलादेशच्या सरकारे चीन, पाकिस्तानसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भारतावर काय परिणाम होतील? भारतीय उपखंडातील राजकारण कसं असेल, पाहूया...

इंग्रजी वृत्तपत्र 'हिंदुस्तान टाइम्स'च्या अहवालात एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे की, नाहिद इस्लाम यांनी या भेटीत पाकिस्तानसोबत १९७१ च्या मुद्द्याचे निराकरण करण्याबद्दल चर्चा केली. गेल्या काही वर्षांत १९७१ ची लढाई दोन्ही देशांमधील एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. त्याआधी ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा केली होती. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानच्या युद्धानंतर पाकिस्तानपासून विभक्त होऊन बांगलादेश निर्माण झाला होता. बांगलादेशाच्या निर्मितीत भारताची महत्त्वपूर्ण भूमिका होती, तर चीन बांगलादेशाच्या निर्मितीविरुद्ध होता.

मात्र आता बांगलादेशचं नवीन अंतरिम सरकारची चीनकडे पावले पडताना दिसत आहेत. शेख हसीना यांना बेदखल करताच नवीन सरकारे २०१३ मध्ये शेख हसीना सरकारने बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीवरील बंदी उठवली. जमात-ए-इस्लामी ही बांगलादेशची सर्वात मोठी इस्लामी संघटना आहे. या संघटनेचे विद्यार्थी संघटन खूप मजबूत आहे. या विद्यार्थी संघटनेच्या उग्र आंदोलनामुळेच शेख हसीनांची सत्ता गेली.

यावर देशात हिंसा आणि अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. भारतातील बाबरी मशीद पाडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूविरोधी दंगली भडकवल्याचा आरोप देखील जमातवर लावण्यात आला आहे. जमात-ए-इस्लामीची प्रतिमा भारतविरोधी असल्याचे मानले जाते. जमात-ए-इस्लामीचे प्रमुख शफीक-उर-रहमान यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, भारताने भूतकाळात काही असे निर्णय घेतले आहेत जे बांगलादेशच्या जनतेला आवडले नाहीत. रहमान यांनी बांगलादेशमध्ये नुकत्याच आलेल्या पुरासाठी भारताला जबाबदार ठरवले होते. तसंच "बांगलादेशने भूतकाळातील ओझे मागे सोडून अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांसारख्या देशांशी मजबूत आणि समन्वयाचे संबंध ठेवायला हवेत."

चीनसाठी संधी?

जमात-ए-इस्लामीवरील बंदी उठवल्यानंतर जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांनी चीनच्या राजदूताची भेट घेतली. चीनी राजदूत याओ वेन म्हणाले, "चीनला बांगलादेशसोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. चीन बांगलादेश आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समर्थक आहे." शेख हसीना सरकारमध्ये बांगलादेश भारताच्या बाजूने झुकला होता. जुलै महिन्यात शेख हसीना त्यांचा चीन दौरा मध्येच सोडून बांगलादेशला परतल्या होत्या. त्यानंतर शेख हसीना म्हणाल्या होत्या की, तीस्ता प्रकल्पामध्ये भारत आणि चीन दोघांचेही स्वारस्य आहे, परंतु हा प्रकल्प भारताने पूर्ण करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती, हे निश्चितपणे चीनला मान्य झाले नसावे. असं म्हटलं जात आहे की, शेख हसीनांची सत्ता जाणं चीन आणि पाकिस्तानसाठी मोठी संधी मिळाली आहे. चीनी राजदूत आणि जमात नेत्यांची भेटही याच दृष्टिकोनातून पाहिली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT