Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : ३.८ दशलक्ष हेक्टरवरील जंगल नष्ट, १० दशलक्ष चौकिमीवर विषारी ढग; का धुससतेय दक्षिण अमेरिका? वाचा सविस्तर

Sandeep Gawade

वसुंधरेचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अमेझॉनचं जंगल आणि दक्षिण अमेरिका सध्या भयंकर आगीच्या ज्वाळांनी वेढली आहे. दोन दशकांतील सर्वात भयंकर जंगलातील आगींचा सामना करावा लागत आहे. या वर्षीच्या वाइल्डफायर सीझनमध्ये लागलेल्या आगींची संख्या आधीच्या आगीच्या घटनांपेक्षा कितीतरी भयंकर कितीतरी पटीने अधिक आहेत. ब्राझीलच्या INPE (National Institute for Space Research) या संस्थेच्या उपग्रह डेटामध्ये दक्षिण अमेरिकेतील १३ देशांमध्ये एकूण ३,४६,११२ हॉटस्पॉट्स आढळले आहेत. जो २००७ च्या ३,४५,३२२ आगींच्या घटनांपेक्षा अधिक आहे.

या वर्षीच्या सुरुवातीपासून अमेझॉनच्या वर्षावनांमध्ये (Amazon Rain Forest) मोठ्या प्रमाणात आगी भडकल्या आहेत, ज्यामुळे ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया आणि इतर शेजारील देशांमध्ये लाखो हेक्टर जमिनीवर जंगलं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. सध्या दक्षिण अमेरिकेत जंगलांमध्ये आगींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याचा परिणाम जीवसृष्टी, वातावरण, तसेच हवामानावर होत आहे.

ब्राझील सर्वाधिक प्रभावित देश

दक्षिण अमेरिकेत लागलेल्या जंगलातील आगींच्या बाबतीत सर्वात जास्त प्रभावित झालेला देश म्हणजे ब्राझील. या खंडातील सर्व आगींपैकी जवळपास ६० टक्के आगीच्या घटना ब्राझीलमध्ये घडल्या आहेत. Mapbiomas या ब्राझीलमधील एका NGO च्या रिपोर्टनुसार, जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ११ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील जंगल आगीमुळे नष्ट झालं आहे. जे उत्तराखंड राज्याच्या आकाराच्या जवळजवळ दुप्पट आहे. ऍमेझॉनच्या जंगलासोबतच सेराडो (जगातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले सवाना) आणि पतानल वेटलँड्स या परिसंस्थाही या आगीची झळ बसली आहे.

इतर देशांवर आगींचा परिणाम

ब्राझीलनंतर बोलिव्हियामध्ये आगींनी सर्वाधिक नुकसान केले आहे. INPE च्या आकडेवारीनुसार, १३ सप्टेंबरपर्यंत बोलिव्हियातील ३.८ दशलक्ष हेक्टर जंगल आणि गवताळ प्रदेश आगीने नष्ट झाले आहेत. तर पेरू, अर्जेंटिना, आणि पराग्वे या देशांमध्येही आगींचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

वातावरणीय दुष्परिणाम आणि धूराचे संकट

या जंगलातील आगींमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतं आहे, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांच्या आकाशावर विषारी ढग पसरले आहेत. Live Science च्या अहवालानुसार, या धुरामुळे १० दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विषारी ढग तयार झाले आहेत. तब्बल अमेरिकेच्या आकारापेक्षा मोठ्या भूभागावर हे ढग साचले आहेत. त्यामुळे जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

उरुग्वेच्या हवामान तज्ज्ञ नतालिया गिल यांच्या मते, दक्षिण ब्राझील, उत्तर अर्जेंटिना, बोलिव्हिया, पराग्वे, आणि उत्तर-पूर्व उरुग्वे येथील शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेत घट होत आहे. काही शहरांमध्ये धुरामुळे दृश्यमानता कमी झाली असून "काळा पाऊस" (Black Rain) पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अर्जेंटिनातील किमान ११ प्रांतांमध्ये अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली आहे.

दरवर्षी १२ हजार अकला मृत्यू

धुरामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. INPE च्या संशोधक कार्ला लोंगो यांच्या मते, या धुरामुळे श्वसनाचे त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, ज्यामुळे हजारो अकाली मृत्यू होऊ शकतात. एका २०२३ च्या अभ्यासानुसार, वाइल्डफायरच्या धुरामुळे दरवर्षी दक्षिण अमेरिकेत सुमारे १२,००० अकाली मृत्यू होतात.

जंगलांसाठी शेती कर्दनकाळ ठरतेय का?

दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान दक्षिण अमेरिकेला मोठ्या प्रमाणात आगींचा सामना करावा लागतो. वाइल्डफायर सीझन म्हणून हा कालखंड ओळखला जातो. मात्र, यावर्षी परिस्थिती अधिकच गंभीर आहे. खंडातील ऐतिहासिक दुष्काळामुळे आगींचे प्रमाण अधिक वाढले आहे, विशेषतः ब्राझील, पेरू, आणि बोलिव्हियामध्ये. ब्राझीलमधील ५९% भाग दुष्काळाच्या छायेत आहे. तर ऍमेझॉन खोऱ्यातील नद्यांचा प्रवाहात मोठा घड झाल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

अमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे वाइल्डफायर्सच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आग लागल्यानंतर कोणताही अडथळा निर्माण होत नाही त्यामुळे आग मोठ्या भूभागावर लवकर पसरण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते जंगलतोडच हवामानातील स्थानिक बदलांना जबाबदार आहे, ज्यामुळे तीव्र दुष्काळाचं संकट निर्माण झालं आहे आणि आगीच्या घटना वाढण्यासाठी हे पोषक वातावरण असतं, असं वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या अहवालात म्हटलं आहे.

दरवर्षा ऑक्टोबरमध्ये या प्रदेशात पाऊस पडतो, पण आता त्याची शाश्वती राहिली नाही. ऍमेझॉन एन्व्हायर्नमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विज्ञान संचालिका ऐन अलेंकार यांनी Grist ला माहिती देताना सांगितलं की, पाऊस येईल की नाही, हे आम्हाला माहीत नाही. दुष्काळ, जंगलातील आगी आणि पूर यांसारख्या तीव्र हवामान घटनांचे प्रमाण पुढील काही वर्षांत अधिकच वाढेल, कारण जागतिक तापमानवाढीचे प्रमाण सुरूच राहील, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

Bhumi Pednekar: जाळ अन् धूर संगठच! भूमीच्या सौंदर्याचा जलवा

शाब्बास रं पठ्ठ्या! Online Gamingमध्ये गमावले १५ लाख; व्हिडिओ पोस्ट करत SPकडे मागितली मदत

OBC Reservation : ओबीसी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Karjat Picnic Spot : मित्रांसोबत करा भटकंतीचा प्लान कर्जतजवळ अनुभवा निसर्गाचा अद्भुत चमत्कार

SCROLL FOR NEXT