Monkeypox
Monkeypox Saam Tv
देश विदेश

Monkeypox: मंकीपॉक्स संपूर्ण देशात फैलावणार का? ICMR च्या शास्त्रज्ज्ञांनी सांगितलं...

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: केरळमध्ये मंकीपॉक्सचे (Monkeypox) दोन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं असून, तात्काळ पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि बंदरांवरून आलेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी मंकीपॉक्स संपूर्ण देशभरात फैलावणार का, या सामन्यांना पडलेल्या प्रश्नाचं आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ज्ञांनी उत्तर दिलं आहे.

केरळमध्ये (Keral) मंकीपॉक्सचे दोन रुग्ण सापडले आहेत. देशातील पहिला रुग्ण हा केरळमध्येच सापडला. त्यानंतर केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं. केंद्र सरकार सतर्क झालं असून, तात्काळ पावलं उचलली आहेत. त्यादृष्टीने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. विमानतळांवरून येणाऱ्या प्रवाशांवर 'नजर' असणार आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, मंकीपॉक्स (Monkeypox) हा आजार संपूर्ण देशात पसरू शकतो का? अशी शंका आणि भीतीही सर्वसामान्यांच्या मनात आहे. त्याचवेळी पुणेस्थित इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर (ICMR) नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलं की, सध्या देशात हा आजार नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

यादव म्हणाल्या की, अद्याप आपल्या देशात मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सरकार आधीपासूनच सतर्क झाले आहे. यासंदर्भातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष आहे.

कोरोना महामारीच्या काळात आरोग्यविषयक यंत्रणेला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकही सतर्क असतात. जगात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यावेळी सरकार सतर्क झाले होतं. तेव्हापासून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्यांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. राज्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड सुद्धा तयार केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. दोन रुग्ण सापडले असले तरी, परिस्थिती नियंत्रणात आहे.

१४ जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

देशात १४ जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. तो रुग्ण युएईतून परतला होता. त्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा व्हायरस आहे. जगभरात आतापर्यंत ६३ देशांमध्ये मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

SCROLL FOR NEXT