Wife left home due to tomato fight Saam TV
देश विदेश

Wife left home due to tomato fight: टोमॅटोमुळे मोडला संसार! पतीने परवानगी न घेता टोमॅटो वापरला; संतापलेल्या पत्नीने घरच सोडून दिलं

Tomatoes High Price: टोमॅटोमुळे बायको आपल्या मुलीला घेऊन नवऱ्याचं घर सोडून गेलीये.

Ruchika Jadhav

Madhya Pradesh News: राज्यात सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अशात टोमॅटोने तर मोठी उसळी घेतलीये. टोमॅटोचे वाढत असलेले दर पाहता सामान्य कुटुंबातील व्यक्तींनी भाजीत टोमॅटो टाकणे बंद केलंय. अशात याच टोमॅटोमुळे नवरा बायकोची जंगी भांडणंही झालीत. एवढंच नाही तर टोमॅटोमुळे बायको आपल्या मुलीला घेऊन नवऱ्याचं घर सोडून गेलीये.(Latest Marathi News)

मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) ही घटना घडली आहे. टोमॅटो सध्या बाजारात भाव खातोय. टोमॅटेचे भाव इतके वाढलेत की मॅकडॉनल्ड सारख्या कंपनीने आपल्या बर्गरमधून टोमॅटो गायब केलेत. आता हा टोमॅटो (Tomato) नवरा बायकोच्या वादाचं कारण बनलाय. मध्य प्रदेशमधील ही घटना संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलीये.

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशमध्ये संजीव बर्मन आणि त्यांची बायको जेवण्याचा डबा देण्याचा व्यवसाय करतात. संजीव यांनी जेवण बनवताना दोन टोमॅटे वापरले. संजीव यांची एक चूक झाली. त्यांनी टोमॅटो वापरताना बायकोची परवानगी घेतली नाही. ही गोष्ट संजीव यांच्या बायकोला कळाली आणि संजीव यांच्या बायकोच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

त्यांनी संजीव यांच्यासोबत वाद घातला. दोघांमध्ये चांगलीच भांडणं झाली. संजीव यांना वाटलं थोड्या वेळात बायको शांत होईल. पण बायकोच्या डोक्यात राग गेला होता. पत्नीने थेट आपलं सामान आवरलं आणि मुलीसोबत घर सोडलं. बायकोने मुलीसोबत घर सोडलं हे कळताच संजीव यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

संजीव यांनी बायको आणि मुलीला खूप शोधलं. तिच्या माहेरी फोन केले, नातेवाईकांकडे फोन केला, पण बायको आणि मुलीची माहिती मिळाली नाही. संजीव यांनी बायको आणि मुलीचा खूप शोधही घेतला, पण काही केल्या दोघी सापडल्या नाही.

अखेर थकलेले संजीव पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलिसांकडे रडत रडत त्यांनी आपली कहाणी सांगितली. पोलिसांनीही संजीव यांची तक्रार नोंदवून घेतली. तसंच तुमच्या बायकोला आणि मुलीला शोधून घरी आणून सोडू असं आश्वासनही दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

SCROLL FOR NEXT