Baramulla Encounter Saam Tv(ANI)
देश विदेश

Baramulla Encounter: उरीमध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा; चकमकीत जवानांनी आतापर्यंत दोघांना टिपले; सर्च ऑपरेशन सुरूच

Kashmir Encounter: काश्मीरच्या उत्तर भागातील सीमेरेषेजवळ असलेल्या उरी (Uri) (बारामुल्ला) येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरूय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Two Terrorists killed In Baramulla Encounter:

काश्मीरच्या उत्तर भागातील सीमेरेषेजवळ असलेल्या उरी (Uri) (बारामुल्ला) येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरूय. यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तर दोन दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दला (Army)कडून घेतला जात आहे. (Latest National News)

दरम्यान हे दहशतवादी (Terrorists) सीमेपलीकडून आले आहेत की, आधीपासून येथेच राहत होते, याची स्पष्टता अजून झाली नाहीये. ही चकमक अग्रिम गावातील हथलंगाच्या बाहेरील परिसरात होत आहे. येथे घनदाट जंगल असून यात पाण्याचे नाले आणि काही बेवारस घरे आहेत. लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हथलंगा परिसरात काही दहशतवाद्याचा एक गट लपून बसल्याची माहिती पोलिसांना काल रात्री मिळाली होती. दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर दलानं संयुक्त कारवाई करत त्या परिसरात नाकेबंदी केली.

आज सुरक्षा दल हे जेव्हा दहशतवाद्यांच्या ठिकाणाकडे पोहोचत होते त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांडून उत्तर देण्यात आलं. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर रायफल ग्रेनेड आणि युबीजीएलनं हल्ला केला. दरम्यान, दहशतवाद्यांच्या संख्येविषयी लष्कर अधिकाऱ्यांनी अजून कोणताच स्पष्ट आकडा सांगितला नाहीये.

परंतु दहशतवाद्यांची संख्या दोन असू शकते असा दावा करण्यात येत आहे. हे दहशतवादी लवकरच मारले जातील किंवा पकडले जातील, असं लष्कर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT