Pm Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Gratuity and Pension : कामात दिरंगाई केल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळणार नाही; मोदी सरकारचा नवा नियम

दोषी कर्मचाऱ्यांची माहिती मिळताच त्यांची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी रोखण्याची कारवाई सुरू करण्यात यावी असं देखील या नव्या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए आणि बोनस दिल्यानंतर एका नियमामध्ये बदल केला आहे. या नियमातील सुचनांकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर त्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासून (Pension and Gratuity) हात धुआवे लागणार आहेत. शिवाय या नियमाकडे दुर्लक्ष न करण्याची ताकीद देखील सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आहे.

या नव्या नियमानुसार आता कोणताही केंद्रीय कर्मचारी आपल्या नियोजित कामामध्ये कुचराई करताना दिसला किंवा कोणी कामामध्ये कुचराई केली तर त्या कर्मचाऱ्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

केंद्र सरकारने नुकतचं सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (Central Civil Services) नियम 2021 नुसार एक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने CCS (पेन्शन) नियम 2021 च्या नियम 8 मध्ये बदल करण्यात आले होते. त्यामध्ये नव्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

या सुचनेनुसार, एखादा केंद्रीय कर्मचारी आपल्या सेवेच्या कार्यकाळामध्ये एखाद्या गंभीर गुन्ह्यात किंवा बेफिकीरीमध्ये दोषी सापडल्यास त्यांची ग्रॅच्युइटी आणि पेन्शन रोखण्यात येईल. शिवाय या सर्व नियमाची माहिती सर्व संबंधित प्राधिकरणांना पाठवण्यात आली आहे. दोषी कर्मचाऱ्यांची माहिती मिळताच त्यांची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी रोखण्याची कारवाई सुरू करण्यात यावी असं देखील या नव्या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या कामाबाबत अधिक जागरुक राहावं लागणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alcohol tolerance difference: पुरुषांपेक्षा महिलांना दारू लगेच का चढते? जाणून घ्या यामागचं सायन्स

Dudhi Bhopala Bharit : दुधी भोपळ्याचे भरीत कधी खाल्ले आहे का? मग लगेचच बनवा ही पौष्टिक डिश

महिला उमेदवाराच्या सभेत भाजप आमदाराच्या समर्थकांचा मोठा राडा आणि शिवीगाळ|VIDEO

Andhra Pradesh Accident Video : बाईकला वाचवताना भरधाव ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला, कारला धडकून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

SCROLL FOR NEXT