ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुधी भोपळ्याचे भरीत हा भोपळा भाजून बनवलेली एक स्वादिष्ट आणि पौष्टिक भारतीय डिश आहे.
दुधी भोपळा, कांदा, टॉमेटो, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ, हळद, तेल, मसाले, आणि जिरे इ. साहित्य लागते.
दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि नंतर तो किसून घ्या. त्यात मीठ घालून ५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
कांदा, टॉमेटो, हिरवी मिरची आणि आलं यांना बारिक कापून घ्या. त्याच बरोबर कोथिंबीरसुध्दा कापा.
एका कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे टाका. नंतर कांदा आणि आलं टाकून सगळे मिश्रण सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात हिरवी मिरची आणि टॉमेटो टाका. वरुन मीठ आणि हळद टाकून जोपर्यंत तेल मुरत नाही तोपर्यंत मसाले परतून घ्या.
तयार झालेल्या मसाल्यामध्ये किसलेला दुधी भोपळा टाका आणि झाकण ठेवा. मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या. मधेमधे चमच्याने हलवत राहा. तुमचे दुधी भोपळ्याचे भरीत तयार आहे.
दुधी भोपळा थोडा नरम झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाका आणि २ मिनिटे शिजवून घ्या. गरमा गरम भरीत चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.