ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मकर संक्रांतीला तिळाला खूप महत्त्व आहे. तिळाची भाकरी ही उष्णता देणारी, पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी असून थंडीत शरीर गरम ठेवण्यास मदत करते.
बाजरीचे पीठ, भाजलेले तिळ, मीठ आणि कोमट पाणी इ. साहित्य लागते.
तिळ हलके भाजून घ्या आणि थोडे कुटून घ्या. यामुळे भाकरीला छान सुगंध आणि खमंग चव येते.
एका भांड्यात बाजरीचे पीठ, भाजलेले तिळ आणि मीठ मिसळा. आता या मिश्रणात हळूहळू कोमट पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.
मळलेल्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा तयार करा. आता हातावर थोडे पाणी घेवून तो गोळा गुळगुळीत करा. भाकरीचे पीठ तयार आहे.
एक मोठी परात घ्या. परातीत ओला कपडा किंवा पिठ टाका आणि त्यावर भाकरी हळूच थापा. जाडसर भाकरी ठेवली तर चव अधिक छान लागते.
भाकरी थापून तयार झाल्यावर भाकरीच्या एका बाजूला तीळ लावा आणि हलकेसे दाबून घ्या.
तवा गरम करण्यास ठेवा. गरम तव्यावर भाकरी टाका. तीळ लावलेली बाजू आधी तव्यावर ठेवा.दोन्ही बाजूंनी नीट सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाकरीवर थोडे पाणी शिंपडल्यास भाकरी मऊ राहते.
गरम भाकरीवर घरचं तूप लावा. तूप लावल्याने तिळाचा खमंग स्वाद अधिकच खुलतो.
तिळाची भाकरी ठेचा, पिठलं किंवा आमटीसोबत सर्व्ह करा.