Elon musk on partner Shivon zilis Saam Tv
देश विदेश

Elon Musk: 'माझी पार्टनर आर्धी भारतीय, मुलाचं नाव ठेवलं शेखर'; एलन मस्क यांचा खुलासा

Elon musk on partner Shivon zilis: एलन मस्क यांनी पार्टनर शिवॉन जिलिस यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'माझी पार्टनर आर्धी भारतीय असून आम्ही मुलाचं नाव ठेवलं शेखर ठेवले असे त्यांनी सांगितले.

Priya More

Summary -

  • निखिल कामत यांच्या पॉडकास्टवर एलन मस्क यांनी मोठा खुलासा केला

  • पार्टनर शिवॉन जिलिस या आर्ध्या भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले

  • त्यांच्या मुलाच्या नावात शेखर हे नाव असून ते शास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवले आहे.

  • शिवॉन जिलिस न्यूरालिंकमध्ये ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्स डायरेक्टर आहेत

जगातील प्रसिद्ध अब्जाधीश म्हणून ओळखले जाणारे टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सीईओ एलोन मस्क यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी त्यांचे पार्टनर शिवॉन जिलिस या आर्धी भारतीय आहेत असे सांगितले. निखिल कामत यांच्या पॉडकास्टवर बोलताना एलन मस्क यांनी असेही सांगितले की, त्यांच्या एका मुलाचे नाव शेखर आहे. हे नाव अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

पॉडकास्ट दरम्यान एलन मस्क यांनी सांगितले की, 'तुम्हाला हे माहित आहे की नाही हे मला माहित नाही पण माझी पार्टनर शिवॉन आर्धी भारतीय आहे. माझ्या आणि तिच्या एका मुलाचे मधले नाव शेखर आहे. जे चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवले आहे. एलन मस्क यांनी पुढे सांगितले की, त्याची पार्टनर शिवॉन जिलिस कॅनडामध्ये वाढल्या आणि त्या लहान होत्या तेव्हा त्यांना दत्तक घेण्यात आले होते. शिवॉन जिलिस २०१७ मध्ये मस्क यांची कंपनी न्यूरालिंकमध्ये रुजू झाल्या आणि सध्या त्या कंपनीत ऑपरेशन्स आणि स्पेशल प्रोजेक्ट्स डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. शिवॉनने येल विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि तत्वज्ञानात पदवी घेतली आहे.

पॉडकास्टमध्ये चर्चा करताना एलन मस्क यांनी सांगितले की, एलन मस्क यांनी मान्य केले की अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा फायदा झाला आहे. भारतीय अभियंते, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी अमेरिकेच्या तांत्रिक आणि व्यावसायिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मस्क यांनी H1-B व्हिसा कार्यक्रम सुरू ठेवण्याचेही समर्थन केले.

एलन मस्क यांनी पुढे H1-B व्हिसा कार्यक्रम बंद झाला नाही पाहिजे असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'H1-B व्हिसाचा काही प्रमाणात गैरवापर झाला आहे. काही आउटसोर्सिंग कंपन्यांनी त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे थांबले पाहिजे. मला वाटत नाही की H1-B व्हिसा कार्यक्रम बंद केला पाहिजे. ते खरोखर वाईट होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतय... कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात; भरसभेत पंकजा मुंडे काय बोलून गेल्या? VIDEO

Maharashtra Live News Update: धुळ्यात दोन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा

Palghar Travel : मुंबईजवळ ट्रेकिंग अन् हायकिंगचा आनंद घ्यायचाय? पालघरमधील 'हे' Hidden स्पॉट नक्की फिरून या

Seawood Darave : रेल्वेचा मोठा निर्णय, आणखी एका स्टेशनचं नामांतर, नाव बदलण्यामागचा इतिहास सांगितला!

Pune Accident : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये भीषण अपघात; दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT