ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला जगभर प्रवास करायचा असतो, पण सर्वजण जिथे खर्च कमी होणार अशा स्वस्त ठिकाणी जाणे पसंत करतात.
जर तुम्ही भारतातून परदेशात प्रवास करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर भारतीय पासपोर्टसह तुम्ही काही ठिकाणी प्रवास करू शकता.
तर जाणून घ्या त्या ७ देशांबद्दल जिथे जाण्यास फक्त भारतीय पासपोर्ट असणे गरजेचे आहे.
सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले मालदीव हे सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. शांत बीच, लक्झरी रिसॉर्ट याकरिता मालदीव प्रसिद्ध आहे. येथे व्हिसा-मुक्त प्रवास करु शकतो.
तुम्ही भारतीय पासपोर्टवर मॉरिशसला प्रवास करू शकता. विमानतळावर आगमन झाल्यावर व्हिसा उपलब्ध आहे. मॉरिशस एक सुंदर बीच डेस्टिनेशन आहे.
व्हिएतनामला भेट देणे काही कठीण नाही. तेथील सौंदर्य, ऐतिहासिक ठिकाणे आणि चविष्ट स्ट्रीट फूड पर्यटकांसाठी आकर्षक आहेत. व्हिएतनाममध्ये एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर काही आहे. येथे व्हिसा ऑन अॅरेव्हल उपलब्ध आहे.
हनिमून किंवा फॅमिली ट्रिपकरिता सेशेल्स हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे आगमनानंतर तीन महिन्यांचा मोफत व्हिसा मिळतो.
भारताच्या शेजारील देश श्रीलंकेला भेट देण्यासाठी तुम्हाला भारतीय पासपोर्टसह व्हिसा ऑन अॅरेव्हल मिळतो.
इंडोनेशिया हे देखील भेट देण्यासाठी बेस्ट ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पासपोर्टसह इंडोनेशियाच्या ट्रिपची प्लानिंग करु शकता. ज्वालामुखी पर्वत आणि विविध पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात, आणि येथील व्हिसा ऑन अॅरेव्हल सुविधा आहे.
दुबई हे सायबर हब म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही व्हिसाशिवाय दुबईला देखील भेट देऊ शकता. शॉपिंग, वाळवंट सफारी आणि नाईटलाइफसाठी दुबई प्रसिद्ध आहे. येथे आगमनानंतर व्हिसा उपलब्ध आहे.