Elon Musk Saam Digital
देश विदेश

Elon Musk : चीनमुळे एलॉन मस्क यांचे बुडाले तब्बल ३.३ लाख कोटी रुपये, काय आहेत कारणं? जाणून घ्या

World Richest Man : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान टेस्टाच्या एलॉन मस्क यांच्या नावावर होता. मात्र मागच्या ७० दिवसांत एलॉन मस्क यांना तब्बल ३.३ लाख कोटी (40 अब्ज डॉलर्स) रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

Sandeep Gawade

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान टेस्टाच्या एलॉन मस्क यांच्या नावावर होता. मात्र मागच्या ७० दिवसांत एलॉन मस्क यांना तब्बल ३.३ लाख कोटी (40 अब्ज डॉलर्स) रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं असून सर्वात श्रीमंत व्यक्तीचा हा मान त्यांनी गमावला आहे. Amazon.com चे संस्थापक जेफ बेझोस आणि लुई व्हिटॉनच्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या नंतर तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. मस्क यांच्या एकूण संपत्तीत घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे टेस्लाचे घसरलेले शेअर्स, चालू वर्षात 29 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.

७0 दिवसात 3.3 लाख कोटी रुपयांचं नुकसान

जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 70 दिवसांत ४० अब्ज डॉलर्स म्हणजेच ३.३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती १८९ अब्ज डॉलर्स आहे. शुक्रवारी त्यांच्या संपत्तीत २.३७ अब्ज डॉलरची घट झाली. 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात इलॉन मस्कची एकूण संपत्ती $340 अब्जांवर पोहोचली होती.

या कारणांमुळे झालं नुकसान

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट होण्यामागे, चीनमध्ये टेस्ला कारच्या विक्रीत लक्षणीय घट आणि बर्लिनजवळील त्याच्या कारखान्यात तोडफोड झाल्यानंतर उत्पादन थांबवण्याची कारण सांगितली जात आहेत. त्याचवेळी, मस्क यांना न्यायालयानेही मोठा धक्का दिला आहे, ज्यामध्ये त्यांचे 55 अब्ज डॉलर्सचे वेतन पॅकेज रद्द करण्याचा आदेश आहे. फॉर्च्युन मासिकाने अहवालानंतर, मस्कने जाहीर केले की दीर्घ-फॉर्मचे व्हिडिओ लवकरच स्मार्ट टेलिव्हिजनवर उपलब्ध होतील, सोशल नेटवर्क X ने पुढील आठवड्यात Amazon आणि Samsung युजर्सना टीव्ही ॲप लॉन्च करण्याची योजना आखली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपविरोधात भूमिका घेतली, नेत्याची थेट पक्षातूनच हकालपट्टी, ६ वर्षांसाठी निलंबित

हिरोला टक्कर देणार होंडा! नवीन Shine 100 DX बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mrunal Thakur : अभिनयासाठी कॉलेज सोडलं, टीव्हीन तिला स्टार बनवलं, मृणाल ठाकूरच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Bollywood Best Friend: तेरा यार हूँ मैं...; बॉलिवूडच्या ७ जिगरी मित्रांच्या जोड्या तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra Live News Update : सुरेश वरपुडकर जरी भाजप मध्ये गेले असले तरी परभणीतील काँग्रेस जागेवरच

SCROLL FOR NEXT