Amol Kolhe latest Speech : संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे? अमोल कोल्हे कडाडले

Amol Kolhe Latest News : संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे? अशा शब्दात खासदार कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Amol Kolhe
Amol KolheSaam tv
Published On

Amol Kolhe Lates News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिरुरमधील ठाकरे गटाच्या मेळ्याव्याला हजेरी लावली. या मेळाव्यातील कार्यक्रमात खासदार कोल्हेंनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी खासदार कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे? अशा शब्दात खासदार कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Latest Marathi News)

अमोल कोल्हे यांच्या भाषणातील सविस्तर मुद्दे

१. लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचे काम झालं आहे. कांदा निर्यातबंदी लागल्यावर खासदारांची तोंड शिवली होती का?

२. दिल्लीतून गुबुबु करत, नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे? अभिनेता हा भुमिकेशी प्रामाणिक राहिला आहे. तुमच्या समोर शेतकऱ्यांचा पोरगा उभा आहे.

३. आता गाफील राहू नका, राज्याची परिस्थिती बदलत आहे. शेतकऱ्याच्या पोराला रोखण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांनी ताकद लावली आहे. गाफील राहू नका. ताट मानेने लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. खासदार गल्लीत बोलत फिरण्यापेक्षा संसदेत गरजणारा हवा. ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं, त्यांच्यासाठी मानाचे पान का ठेवलं नाही.

Amol Kolhe
Rajasthan Congress : काँग्रेसला मोठा धक्का; राजस्थानमधील गहलोत, पायलट समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

४. बैलगाडा शर्यत, पुणे-नाशिक मार्ग, पुणे-नाशिक रेल्वे, यापेक्षा आधिक महामार्ग जोडले. कोरोना काळात पाच लाख नागरिकांचे लसीकरण देशात पहिला मतदारसंघ ठरला आहे.

५. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या विचारांचा आणि तत्वांचा लढा असणार आहे. पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवत आपण सत्यासाठी लढणार आहोत.

६. पुढील काळ हा संघर्षाचा असणार आहे. शेतकरी बांधवांना, कष्टकऱ्यांना, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकरी विरोधी सरकार घालवायचं आहे. आपल्याला पुन्हा बळीराजाचे राज्य स्थापन करण्यासाठी एकजुटीने लढायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com