Electoral Bonds: सर्वोच्च न्यायालयाने आपली प्रतिष्ठा वाचवावी; SBI ने इलेक्टोरल बाँड्सवर वेळ मागितल्यावर सिब्बल म्हणाले...

Kapil Sibal News: इलेक्टोरल बाँड्सबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मोठा निर्णय दिला होता. या निर्णयात न्यायालयाने एसबीआयला इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्यांची यादी सार्वजनिक करण्यास सांगितलं होतं.
Kapil Sibal On SBI
Kapil Sibal On SBISaam Tv
Published On

Kapil Sibal On SBI:

इलेक्टोरल बाँड्सबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मोठा निर्णय दिला होता. या निर्णयात न्यायालयाने एसबीआयला इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्यांची यादी सार्वजनिक करण्यास सांगितलं होतं. या मुद्द्यावर पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे.

इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर एसबीआयच्या याचिकेच्या संदर्भात कपिल सिब्बल म्हणाले, ''आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करणं ही सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे. घटनापीठानं आपला निकाल दिल्यावर एसबीआयची याचिका स्वीकारणं सोपं जाणार नाही.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kapil Sibal On SBI
Ravindra Waikar : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार?

एसबीआयने इलेक्टोरल बाँड्सचे तपशील उघड करण्यासाठी आणखी काही वेळ मागितला आहे. यावर सिब्बल म्हणाले की, ''त्यांना कोणाला तरी वाचवायचं आहे.'' सिब्बल म्हणाले, ''हे स्पष्ट आहे की एसबीआयचा सरकारचं संरक्षण करण्याचा हेतू आहे. नाही तर बँकेने एप्रिल-मे मध्ये निवडणुका होणार असताना 30 जूनपर्यंत इलेक्टोरल बाँड्सचे तपशील जाहीर करण्यासाठी मुदत वाढवण्याची विनंती केली नसती.'' (Latest Marathi News)

दरम्यान, भारतीय स्टेट बँकेने इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासाठी न्यायालयाकडं 30 जूनपर्यंत मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच इलेक्टोरल बाँड्सची योजना रद्द केली होती. तसेच न्यायालयाने एसबीआयला निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यास सांगितले होते.

Kapil Sibal On SBI
Rajasthan Congress : काँग्रेसला मोठा धक्का; राजस्थानमधील गहलोत, पायलट समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एसबीआयला एप्रिल 2019 पासून आतापर्यंत मिळालेल्या देणग्यांची माहिती 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला देण्यास सांगितले होते. न्यायालयाने निवडणूक आयोगाला 13 मार्चपर्यंत ही माहिती आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com