Elon Musk-Parag Agrawal Saam Tv
देश विदेश

Twitterची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे येताच CEO पराग अग्रवालांना हटवलं; दोघांमधील वाद, डीलमधील चढ-उतार... वर्षभरात काय घडलं?

पराग अग्रवाल गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ बनले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) यांच्यातील डीलची खूप चर्चा होती. मात्र अनेक चढ-उतारानंतर अखेर आज 28 ऑक्टोबरला ट्विटर पूर्णपणे इलॉन मस्क यांच्या हाती आलं आहे. ट्विटरची मालकी हाती येताच सर्वप्रथम कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवण्यात आलं आहे. मात्र मस्क (Elon Musk) आणि अग्रवाल यांच्यात नेमका तणाव काय होता?

ट्विटरवरून पायउतार झालेले भारतीय वंशाचे पराग अग्रवाल सुरुवातीपासूनच मस्क यांच्या विरोधात जोरदार आवाज उठवत आहे. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली लावल्यापासून कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी वाद झाला होता. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी अशी अनेक वक्तव्ये केली, ज्यामुळे दोघांमधील तणाव स्पष्टपणे उघड झाला. पराग अग्रवाल यांनी कराराची घोषणा होताच टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले की, 'कंपनीचे भविष्य आता अंधारात आहे, मला माहित नाही की ते कोणत्या दिशेने जाईल.'

पराग अग्रवाल यांच्या या वक्तव्यानंतर आधीच अंदाज बांधले जात होते, की त्यांना ट्विटर सीईओ पदावरून हटवलं जणार. शुक्रवार 28 ऑक्टोबर 2022 रोजी असेच काहीसे घडले. इलॉन मस्क यांनी ट्विटर डील पूर्ण केली आणि ते अॅक्शन मोडमध्ये येताच, पराग अग्रवाल यांना प्रथम बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय लीगल पॉलिसी, ट्रस्ट आणि सेफ्टी विभागाचे हेड विजय गडदे यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. (Latest News Update)

सीईओपदी एक वर्षही राहिले नाहीत

पराग अग्रवाल गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ बनले. अग्रवाल 10 वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून ट्विटरमध्ये रुजू झाले आणि 2017 मध्ये कंपनीचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर बनले. यानंतर जॅक डोर्सी यांच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले, पण सीईओ बनताच इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आणि वर्षभरातच पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले.

मस्क यांनी केला हा मोठा आरोप

इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द केल्याची घोषणा केल्यानंतरही पराग अग्रवाल उघडपणे समोर आले होते आणि त्यांनी मस्क यांच्यावर हल्लाबोल केला होता. दुसरीकडे, ट्विटरचे नवे बॉस बनलेले इलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यांच्या संख्येबद्दल पराग अग्रवाल यांच्यासह ट्विटरच्या इतर वरिष्ठ अधिकारी आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी किंवा न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्यासाठी मस्क यांच्याकडे 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत होती.

डीलमध्ये आलेले चढ-उतार

  • 4 एप्रिल 2022: मस्क यांनी ट्विटरमधील 9.2 टक्के भागभांडवल विकत घेतले आणि कंपनीचा सर्वात मोठा शेअर होल्डर बनले.

  • 5 एप्रिल 2022: सर्वात मोठे शेअरहोल्डर असल्याने, इलॉन मस्क यांना ट्विटर बोर्डवर अटींसह स्थान देण्यात आले.

  • 11 एप्रिल 2022: ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सांगितले की इलॉन मस्क ट्विटर बोर्डमध्ये सामील होणार नाहीत.

  • 13 एप्रिल 2022: इलॉन मस्क यांनी बोर्डाला पत्र लिहून ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली.

  • 15 एप्रिल 2022: मस्क यांच्या ट्विटर टेकओव्हर टाळण्यासाठी कंपनीने Poison Pill ची घोषणा केली.

  • 8 जुलै 2022: स्पॅम बॉट्सबद्दल योग्य माहिती दिली जात नसल्याचं सांगत, मस्क यांनी करार रद करण्याची घोषणा केली.

  • 12 जुलै 2022: डीलमधून माघार घेतल्यानंतर ट्विटरने इलॉन मस्क यांच्या विरोधात डेलावेर न्यायालयात अपील केले.

  • 28 ऑक्टोबर : मस्क आणि ट्वीटरमधील डील पूर्ण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

SCROLL FOR NEXT