Tata Airbus: अरे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवणार आहात...; टाटा एअरबस प्रकल्पावरुन जयंत पाटील आक्रमक

वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे.
Jayant Patil
Jayant Patil Saam TV

रुपाली बडवे -

Tata Airbus Project : 'अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात' असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार ? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे.

टाटा एअरबस (Tata Airbus) हा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुरजातला गेला असून त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. टाटा एअरबस हा तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झाल्याचं विरोधक म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ -

अशातच आता जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) सडकून टीका केली आहे. याबाबत आपल्या ट्विटमध्ये पाटील यांनी म्हटलं आहे की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते.

Jayant Patil
'टाटा एअरबस' प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे, रोहित पवारांनी शिंदे सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, खोके सरकारवर...

महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. त्यामुळे टाटा एअरबस प्रकल्पाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com