तामिळनाडू: इलेक्ट्रीक स्कुटरबद्दलच्या सरकारच्या कठोर निर्णयानंतरही देशभरात स्कूटरला आग लागण्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत. कधी चार्जिंग करताना इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) आग लागल्याच्या बातम्या कानावर येतात, तर कधी चालता-बोलता तीने अचानक पेट घेतल्याच्या घटना ऐकू येतात. तसेच डीलरशिपमध्येही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. असच ताजं प्रकरण तामिळनाडूमधलं असून या घटनेत इलेक्ट्रिक स्कूटरचा चालक थोडक्यात बचावला आहे. (Tamil Nadu Electric Scooter Fire News Updates )
सीटखाली अचानक आग!
ET च्या बातमीनुसार, ही घटना तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील आहे. तेथील रहिवासी सतीश कुमार यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter Caught Fire) शनिवारी अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. बातमीनुसार, सतीश यांना अचानक स्कुटरच्या सीटखाली आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर स्कूटरवरून उतरून त्यांनी पळ काढला. सतीश आणि तेथून जाणाऱ्या लोकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग विझली नाही. सतीशने गेल्या वर्षी ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती.
इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना एकापाठोपाठ एक घडत असून आता ही मोठी समस्या बनली आहे. अलीकडेच अशाच एका घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला होता. वेल्लोर जिल्ह्यातील या प्रकरणात, घरी इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करत असताना ही घटना घडली होती. यादरम्यान स्फोट झाला आणि आगीच्या धुरामुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला होता. तसेच तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मानापराई येथे एका इलेक्ट्रिक स्कूटरलाही आग लागली.
सरकार उच्चस्तरीय चौकशी;
तेलंगणामध्ये घरात बॅटरी चार्ज करत असताना स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. तर अलीकडेच, एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका ग्राहकाने ओलाच्या स्कूटरची चक्क गाढवावरून परेड काढली. तसेच त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. काही दिवसांपूर्वी ओकिनावा येथील एका डीलरशिपला आग लागल्याची घटना घडली होती. या बाबी लक्षात घेऊन सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.