KGF Chapter 2 ने गाठला 1000 कोटींचा टप्पा; चित्रपटाने बनवले 'हे' 7 रेकॉर्डस् !

प्रशांत निल (Prashant Neel) दिग्दर्शित कन्नड चित्रपट केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) ची क्रेज जगभर पसरली आहे, या चित्रपटाने जागतिक पातळीवर करोडो रुपयांची कमाई केली आहे.
KGF 2
KGF 2Instagram/@thenameisyash
Published On

KGF Chapter 2: प्रशांत निल (Prashant Neel) दिग्दर्शित कन्नड चित्रपट केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) ची क्रेज जगभर पसरली आहे, या चित्रपटाने जागतिक पातळीवर करोडो रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पण रेकॉर्ड ब्रेक केला आहे, KGF Chapter 2 ने 1000 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे (KGF Chapter 2 Box Office Collection 1000 Cr Club). यासोबतच चित्रपटाने अनेक रेकॉर्डस् बनवलेही आहेत अन् तोडलेही आहेत.

KGF Chapter 2 हा 2018 मधील आलेल्या KGF चित्रपटाचा दुसरा भाग (sequel) आहे. या चित्रपटाची कथा रॉकी भाई या पात्रावर आधारित आहे. जो गरिबीतून उठून गोल्ड माइन्सचा किंग बनतो. या चित्रपटात संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे. (KGF Chapter 2 Box Office Collection)

KGF 2
कोणालाही लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश

1) भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट;

KGF Chapter 2 हा चौथा भारतीय चित्रपट आहे, ज्याने 1000 कोटींचा गल्ला केला आहे. यापूर्वी RRR ने 1115 कोटींची कमाई केली होती, बाहुबली 2 ने 1810 कोटींचा व्यवसाय केला होता आणि दंगलने 2024 कोटींची कमाई केली होती. तर, या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट RRR ला मागे टाकून पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवेल असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

2) कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट;

जगभरात 1000 कोटींची कमाई केल्यानंतर, KGF Chapter 2 हा कन्नड सिनेमातील (Kannad Film Industry) सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. एकट्या KGF Chapter 2 ने कन्नड उद्योगातील 12 सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. इतर कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर या एकूण कमाईच्या एक चतुर्थांश कमाई केलेली नाही.

3) वीकेंडच्या ओपनिंगला चित्रपटाचे मोठे कलेक्शन;

KGF Chapter 2 ने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्येच मोठ्या कमाईसोबत पाऊल टाकले होते. या चित्रपटाने वीकेंडला, KGF 2 ने बाहुबली 2 च्या जागतिक कलेक्शनचा (World Wide Collection) मागे टाकले आहे. या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये 552 कोटींची कमाई केली होती. तर बाहुबली 2 चे कलेक्शन 526 कोटी रुपये होते.

4) पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट;

कन्नड चित्रपटांच्या हिंदी डब केलेल्या चित्रपटांनी क्वचितच एवढी चांगली कामगिरी केली आहे. KGF च्या हिंदी सिक्वलचे लाइफटाइम कलेक्शन 50 कोटी रुपये होते, जे त्यावेळी चांगली कमाई मानली जात होती. पण KGF Chapter 2 ने पहिल्या दिवसापासून खूप कमाई करायला सुरुवात केली. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 52 कोटी रुपये होती, जी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.

हे देखील पाहा-

5) कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट;

चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या बंपर कमाईमुळे, KGF Chapter 2 ने बक्कळ कमाई केली. जर्सी आणि रनवे 34 सारख्या चित्रपटांच्या आधी हा प्रदर्शित झाला त्यामुळे या चित्रपटाला कमाईसाठी मोकळा मार्ग मिळाला. रिलीजच्या दोन आठवड्यात, KGF Chapter 2 च्या हिंदी व्हर्जनने 350 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यासह, हा कोविड नंतर सुरु झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. यासह, हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. याआधी दंगल आणि बाहुबली 2 चे नाव आहे.

6) ऍडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट;

तसेच, KGF Chapter 2 ने रिलीज होण्यापूर्वीच रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली होती. हे ऍडव्हान्स बुकिंगमधेच कळून आले होते. यशच्या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगमधून 60 कोटींची कमाई केली होती. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बाहुबली 2 ने अॅडव्हान्स बुकिंगमधून 58 कोटी रुपये कमावले आहेत.

7) रिजनल सिनेमांचेही अनेक रेकॉर्ड मोडले;

KGF Chapter 2 ने अनेक जागतिक आणि राष्ट्रीय विक्रम मोडण्यासोबतच, बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमही रचले आहेत. ओडिशात (Odisha) 10 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. यासह त्याने सर्व ओडिया चित्रपटांना मागे टाकले आहे. केरळमधील (Kerala) सर्वात जलद 50 कोटींचा चित्रपट देखील KGF 2 आहे. या चित्रपटाने मुंबई आणि तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) प्रत्येकी 100 कोटींची कमाई केली आहे. KGF Chapter 2 ने बॉक्स ऑफिसवर इतकी चांगली कामगिरी केली आहे की कन्नड भाषेतील चित्रपट असूनही, त्याने तमिळ चित्रपट बीस्टला मागे टाकले आहे अशी माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com